• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच हटवता येते; ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा

मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच हटवता येते; ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजावरील याचिकेला निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले आहे. ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 26, 2026, 10:44 PM IST|Updated: Oct 26, 2026, 10:49 PM IST
joinshare
मुख्य निवडणूक आयुक्तांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच हटवता येते; ज्ञानेश कुमार यांच्यावरील आरोपांबाबत मोठा खुलासा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

ज्ञानेश कुमार : मतदार यादी छाननी (SIR) संदर्भात उपस्थित झालेले प्रश्न तसेच ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या आरोपांसदर्भात निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी एकतर्फी कारवाई केल्याच्या आरोपांचे खंडन केले आहे. निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून  मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कामकाजावरील याचिकेला निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात उत्तर दिले आहे. 

फॉर्ममध्ये बदल करण्याचा अधिकार  केंद्र सरकारला

याचिका एका वृत्तावर आधारित असल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.  मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांनी एकमताने प्रतिज्ञापत्राला मंजुरी दिल्याची माहिती देण्यात आली आहे.  जून 2025, ऑक्टोबर 2025आणि मे 2026 मधील SIR आदेश एकमताने घेतल्याचे स्पष्टीकरण आयोगाने दिले आहे. 

फाईलवरील आयुक्तांच्या नोंदी, प्रश्न किंवा सूचना म्हणजे आयोगाचे अंतिम निर्णय नव्हेत, अशी भूमिका निवडणूक आयोगाने मांडली आहे. फॉर्म 6 मधील बदलांसंदर्भातील आरोपांवरही स्पष्टीकरण दिले आहे. आयोगाने असेही म्हटले आहे की, फाईलवरील अधिकाऱ्यांच्या टिप्पण्या किंवा सूचना हा आयोगाचा अंतिम निर्णय मानला जाऊ शकत नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  फॉर्म 6 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. फॉर्ममध्ये बदल करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारला असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.  

ऑनलाइन अर्जातील मजकूर बदलल्यासारखा दिसू शकतो, अशी कबुली आयोगाने दिली आहे. 21 ऑक्टोबरपासून ऑनलाइन अर्ज आणि घोषणापत्र स्वतंत्र करण्याचा निर्णय झाला आहे.  UNMAPPED मतदारांना सुनावणीसाठी बोलावण्याची गरज नाही. BLO घरी जाऊन कागदपत्रे गोळा करणार. ECINet वर मतदाराचे नाव समाविष्ट किंवा वगळण्याचा अधिकार केवळ निवडणूक नोंदणी अधिकाऱ्याला (ERO) असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 

गोव्यातील वगळलेल्या 97 मतदारांपैकी 8 जणांची आधीच नोंदणी. सहा जण परदेशात, तर तिघांकडे पोर्तुगीज पासपोर्ट असल्याचा आयोगाचा दावा आहे.  मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुनावणीयोग्य नसल्याची आयोगाची भूमिका. CEC यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणेच हटवता येते, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. EVM संदर्भातील आव्हान सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्याचा आयोगाचा दावा आहे. 

दसऱ्याच्या सुट्ट्यांमुळे संक्षिप्त उत्तर दाखल. सविस्तर उत्तर दाखल करण्याची परवानगी देण्याची मागणी  सर्वोच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. फाईलवरील चर्चेदरम्यान आयुक्तांनी केलेल्या कोणत्याही टिप्पण्या, प्रश्न किंवा सूचना आयोगाचा निर्णय मानल्या जाऊ शकत नाहीत असे देखील स्पष्ट केले. फाईल प्रथम एका निवडणूक आयुक्तांकडे, त्यानंतर दुसऱ्या आयुक्तांकडे आणि शेवटी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे जाते. तातडीच्या प्रकरणांमध्ये, मंजुरी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळवली जाते आणि नंतर फाईलवर नोंदवली जाते असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rahul Gandhi
india