उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्सप्रेसवेवर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. ताफ्यातील पाच वाहने एका रुग्णवाहिकेवर आदळल्याने अनेक लोक जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे. लखनऊपासून 100 किमी अंतरावर असलेल्या हलियापूर येथे झालेल्या या अपघातात ताफ्याच्या मागील भागातील पाच वाहने सामील होती, असी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान राहुल गांधी सुरक्षित आहेत. जखमी झालेल्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्हीत दिसत आहे त्यानुसार, रुग्णवाहिका उजव्या बाजूच्या फास्ट लेनमध्ये दिसत आहे, तर इतर लेनमध्ये अनेक वाहने गर्दी करून उभी आहेत. अपघातानंतर, धडकेमुळे ज्या स्कॉर्पिओ एसयूव्हीचा पुढचा भाग दबला गेला होता, ती रुग्णवाहिकेच्या समोर थांबलेली दृश्यांमध्ये दिसून येते.
राहुल गांधी एका न्यायालयीन सुनावणीसाठी लखनौला आले होते. तिथून त्यांचा ताफा सुमारे 135 किमी दूर असलेल्या सुलतानपूरच्या दिशेने निघाला होता. जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा ते आपल्या पोहोचण्यच्या ठिकाणापासून सुमारे 35 किमी अंतरावर होते.