• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलन सोडून राहुल गांधी व्हिएतनामला निघून गेले? विमानातील VIDEO शेअर करत भाजपाचा दावा

ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलन सोडून राहुल गांधी व्हिएतनामला निघून गेले? विमानातील VIDEO शेअर करत भाजपाचा दावा

भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधींचा विमानातील व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल गांधी व्हिएतनामला निघून गेल्याचा दावा भाजपाने केला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 20, 2026, 03:29 PM IST|Updated: Oct 20, 2026, 03:34 PM IST
joinshare
ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलन सोडून राहुल गांधी व्हिएतनामला निघून गेले? विमानातील VIDEO शेअर करत भाजपाचा दावा
Image Credit: राहुल गांधी आंदोलन सोडून व्हिएतनामला गेले, भाजपाचा दावा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भाजपने पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वारंवार होणाऱ्या परदेश दौऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत लक्ष्य केले आहे. विरोधी पक्षाचे आंदोलन सुरू असतानाच राहुल गांधी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर गेल्याचा दावा भाजपाने केला आहे. आपल्या दाव्याला दुजोरा देत भाजपाने विमानातील एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधी विमानात बसलेले दिसत आहेत. राहुल गांधी या विमानातून व्हिएतनामला जात असल्याचा दावा भाजपाने केला आहे. आंदोलनांमुळे राहुल गांधी कदाचित खूप थकले असावेत, म्हणूनच ते सुट्टीवर निघून गेले आहेत असा टोला भाजपाने लगावला आहे.

"खोटं पसरवून खूप थकले आहेत. थोडा काळ व्हिएतनामला फिरुन येतो, कोणाला काय कळणार आहे?", अशा उपरोधिक शब्दांत भाजपाने एक्सवर पोस्ट केली आहे. यावेळी त्यांनी एका प्रवाशाने शूट केलेला व्हिडीओही शेअर केला आहे.

भाजपचे प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी टीका केली आहे की, "बघा, राहुल गांधी नेहमीच असं करतात. बिहारमध्ये यात्रा केल्यानंतर ते दोन महिन्यांच्या सुट्टीवर परदेशात गेले होते. कदाचित तेव्हा ते व्हिएतनामला गेले असतील आणि कदाचित यावेळीही ते व्हिएतनामलाच गेले असावेत."

 

”झूठ फैलाते-फैलाते थक गया... कुछ दिन वियतनाम घूम आता हूं... किसी को क्या ही पता चलेगा! 😜”

— BJP (@BJP4India) October 19, 2026

 

भाजपच्या एका नेत्याने म्हटले की, राहुल गांधींना इतकी राजकीय मेहनत झेपत नाही आणि ते वारंवार सुट्ट्यांवर निघून जातात. भाजपच्या शाझिया इल्मी म्हणाल्या, "राहुल गांधींना आता अधिक कष्ट करणे शक्य नव्हते. ते किती मेहनत करणार? मतांच्या चोरीचा मुद्दा तर केवळ एक निमित्त आहे. ते किती आळशी आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. आता पुन्हा त्यांचा पर्यटन प्रवास सुरू झाला आहे. दोन आठवडेही काम न करता ते पुन्हा एकदा निघून गेले आहेत. यावेळी ते व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत."

काँग्रेसने यावर भाजपाला प्रत्युत्तर दिलं असून, विरोधी पक्षनेत्यांच्या परदेश दौऱ्यांवरून भाजप विनाकारण वाद निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित म्हणाले, "कोणी, कुठे आणि कधी प्रवास करावा... यात अडचण काय आहे? इतर लोक परदेशात प्रवास करत नाहीत का? राहुल गांधी एक व्यक्ती आहेत, विरोधी पक्षनेते आहेत; त्यांची काही कर्तव्ये आहेत. ते येल विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात, लंडनमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चा करतात आणि तिथल्या विचारवंतांना भेटतात. ते पत्रकारांना मुलाखतीही देतात, जे काम पंतप्रधान करत नाहीत."

यावेळी काँग्रेसने संसदेचं अधिवेशन सुरु असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जात असल्याचा मुद्दा अधोरेखित केला. "मग, भाजपला यात काय अडचण आहे? आपल्याकडे अशीही एक परंपरा आहे की, लोकसभेचे अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांनी परदेशात जाऊ नये. परंतु, आपल्या पंतप्रधानांनी ही परंपरा मोडली. तेव्हा असा प्रश्न का उपस्थित केला जात नाही?," असं काँग्रेसने म्हटलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rahul Gandhi
BJP