• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'हे आरोप ऐकल्यावर हसू येते', म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; 'असा आचरट...'

'हे आरोप ऐकल्यावर हसू येते', म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; 'असा आचरट...'

मतदार यादीची सखोल तपासणी करण्यासाठी देशात एसआयआर प्रथमच होत आहे, असे नाही. 1952 पासून 2004 पर्यंत आठ वेळा ही प्रक्रिया झाली. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांभी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग गांच्या काळात एसआयआर झाली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 27, 2026, 09:41 AM IST|Updated: Oct 27, 2026, 09:59 AM IST
joinshare
'हे आरोप ऐकल्यावर हसू येते', म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा; 'असा आचरट...'
Image Credit: विशेष लेखाच्या माध्यमातून मांडली भूमिका (प्रातिनिधिक फोटो)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

2

पूर्णेकर प्रकरण तापलं! शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यकर्त्यांना आवाहन; पूर्णेकर समर्थक पोलीस स्टेशनमध्ये

3

नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी! 30 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरला वाहतूक मार्गात मोठे बदल, तर हा रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद

4

टोल प्लाझाच्या 20 किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी गुड न्यूज; 1 नोव्हेंबरपासून नवे नियम लागू

5

मोठी बातमी! 'कर्मचारी विशेष' लोकल कायमची बंद करणार किंवा...; ठाणे स्टेशनवरील कर्मचाऱ्यांच्या मुजोरपणानंतर रेल्वेकडून 2 पर्यायांवर विचार सुरु

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

काँग्रेसला लोकशाहीचा आधार असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उडवून अराजक निर्माण करायचे आहे आणि हेच अंतिम सत्य आहे, असा घणाघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखामधून फडणवीसांनी विरोधकांना लक्ष्य केलं आहे. "'काँग्रेस जिताओ पार्टी' (सीजेपी) च्या पत्रकार परिषदेत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण म्हणाले, 'हम सब चाहते है, रेजीम चेंज हो'.  प्रशांत भूषण यांनी सीजेपी आणि काँग्रेस पक्षाच्या आंदोलनांचा हेतू स्पष्ट केला. 'रेजोम नेंज' म्हणजे राजवट बदलणे- जसा प्रकार शेजारच्या देशांमध्ये झाला.  त्यावरून टीका होऊ लागल्यावर सारवासारव करण्यात आली की, 'रेजीम चेंज' म्हणजे सरकार बदलायचे असे म्हणायचे आहे, अर्थात सरकारसाठी इंग्रजी शब्द 'गव्हर्नमेंट' असा आहे. 'रेजीम' हा नाही. भारताच्या संसदीग लोकशाहीत निवडणुकीतून जनतेच्या मतांच्या आधारे सरकार बदलले जाते," असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

इतकी बेजबाबदार वक्तव्ये कशी करू शकतो

जनतेने 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत  देऊन काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (संपुआ) सरकार बदलले. ही लोकशाहीची पद्धत आहे. लोकशाही आणि संविधान मान्य नसलेले अराजकतावादी निवडणुकांवर विश्वास ठेवत नाहीत, उलट निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. निवडणूक आयोग या सांविधानिक संस्थेवरील आणि देशाच्या निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास नष्ट करण्याचा असाच प्रयत्न सध्या सुरू आहे. एसआयआर प्रक्रियेवर विरोधी पक्षांकडून संशय निर्माण केला जात आहे. केवळ आरोप करायचे आणि तेच खरे असल्याचे भासवून राजीनामा मागायचा, असा हा प्रकार आहे. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 18 ऑक्टोबर रोजी गोवा गेभील जाहीर सभेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर आरोप केला, 'ज्ञानेश कुमार व्होट चोरी की इम्पिलमेंट करते है, अपोझिशन पार्टी के वोट काटते है, हमारे सपोर्टर के वोट काटते है, अपने बोट बढाते है... एक डिस्ट्रिक्ट से दूसरे डिस्ट्रिक्ट में अपने वोटर्स को डालते है, दूसरे स्टेट में अपने वोटर्स को डालते हैं. आता हे आरोप ऐकल्यावर हसू येते. लोकसभेचे विरोधी पक्षनेते या जबाबदार असलेल्या सांविधानिक पदावरील व्यक्ती इतकी बेजबाबदार वक्तव्ये कशी करू शकतो, याचे आश्चर्य वाटते," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आचरट आरोप कधी झाला नाही

"संविधानानुसार प्रक्रिया बिहारसाठी एसआयआरची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 'असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉम्र्स' आणि इतरांनी 2025 साली सर्वोन्न न्यायालयात आव्हान दिले. त्यांनी निवडणूक आयोगाला प्रतिवादी केले. याचिकेवर प्रदीर्घ सुनावणी झाली. 27 मे 2026 रोजी दिलेल्या निकालात सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या पीठाने एसआयआर प्रक्रिया वैध असल्याचा निर्वाळा दिला. त्यासाठी त्यांनी संविधानातील तरतुदी आणि लोकप्रतिनिधित्व कागद्यातील तरतुदींचा संदर्भ दिला. सुमारे वर्षभर सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या प्रक्रियेतून एसआयआर वैध असल्याचे सिद्ध झाले आहे. या सुनावणीत कपिल सिबल यांच्याबरोबरच अभिषेक मनु सिंघवी, प्रशांत भूषण, वृंदा ग्रोव्हर, राजू रामचंद्रन इत्यादी वरिष्ठ वकिलांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली. योगेंद्र यादव यांनीही न्यायालयासमोर निवेदन केले. परंतु सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे मुद्दे फेटाळले. मतदार यादीची सखोल तपासणी करण्यासाठी देशात एसआयआर प्रथमच होत आहे, असे नाही. 1952 पासून 2004 पर्यंत आठ वेळा ही प्रक्रिया झाली. तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांभी, राजीव गांधी, विश्वनाथ प्रताप सिंह, पी. व्ही. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी आणि डॉ. मनमोहन सिंग गांच्या काळात एसआयआर झाली. पण पंतप्रधान आणि मुख्य निवडणूक आयुक्त मिळून मतचोरी करतात, असा आचरट आरोप कधी झाला नाही. सध्याच्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांसारखे बेजबाबदार नेते त्यावेळी नव्हते," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

एसआयआर का

"एसआयआर का, हे आधी समजून घेतले पाहिजे. आपाल्याकडे 2000 नंतर झपाट्याने शहरीकरण झाले. 2004 मध्ये झाले ते केवळ 'समरी रिव्हिजन' होते. म्हणजे जुनी नावे काढली गेली नाहीत, केवळ पुरवणी याद्या जोडल्या गेल्या. म्हणजे एखादी व्यक्ती दुसऱ्या शहरात गेली, तरी पहिल्या शहरात तिचे नाव होतेच आणि दुसऱ्या शहरातही तिने ते नोंदवले होते. त्यामुळेच आज एसआयआरमध्ये शहरी भागांत अधिक दुबार नावे सापडली आहेत. एसआयआरमध्ये बूथस्तरीय अधिकारी मतदारांना अर्ज देतात, त्यावर मतदार आपली माहिती भरतात आणि त्याची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत अनुपस्थित, कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी असलेले मतदार वगळले जातात," असं फडणवीसांनी लेखात म्हटलं आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Rahul Gandhi
Devendra Fadnavis
congress
BJP