• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /लैंगिक सुखाची मागणी, नकार अन्... अंकिता भंडारी प्रकरण आहे तरी काय? 19 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं? या साऱ्याचा भाजपाशी काय संबंध?

लैंगिक सुखाची मागणी, नकार अन्... अंकिता भंडारी प्रकरण आहे तरी काय? 19 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं? या साऱ्याचा भाजपाशी काय संबंध?

संपूर्ण राज्यासहीत देशाला हादरवून सोडणारं अंकिता भंडारी प्रकरण आता राजकीय कारणांमुळे पुन्हा चर्चेत आलं आहे. नेमकं 2022 मध्ये काय घडलं होतं? ही अंकिता आहे तरी कोण? आता हे प्रकरण चर्चेत येण्याचं कारण काय? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 15, 2026, 07:13 AM IST|Updated: Oct 15, 2026, 07:45 AM IST
joinshare
लैंगिक सुखाची मागणी, नकार अन्... अंकिता भंडारी प्रकरण आहे तरी काय? 19 वर्षीय तरुणीसोबत काय घडलं? या साऱ्याचा भाजपाशी काय संबंध?
Image Credit: अंकिताची 2022 साली हत्या करण्यात आली

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भाजपचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आल्यापासून अंकिता भंडारी प्रकरण पुन्हा चर्चेत आलं आहे. अंकिता भंडारी प्रकरणामध्ये दुष्यंत गौतम सहभागी असल्याचा आरोप अंकिताच्या पालकांकडून केला जात आहे. त्यामुळेच दुष्यंत गौतम राज्यपाल होणार हे समजल्यानंतर अंकिताच्या आई-वडिलांनी नवी दिल्लीमधील इंडिया गेट इथे आंदोलन सुरु केलं. या आंदोलनाला बुधवारी सायंकाळी विरोधीपक्ष नेते राहुल गांधींनी भेट दिली. त्यांनी अंकिताला आम्ही न्याय मिळवून देऊ असा विश्वास पालकांना दिला. मात्र पहाटे 3.45 वाजता अचानक अंकिताच्या पालकांबरोबरच इंडिया गेट इथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या खासदारांना दिल्ली पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्यांनी ताब्यात घेतलं. या वेळी अंकिताची आई रडत असतानाही तिला दिल्ली पोलिस दलातील महिलांनी बळजबरीने बसमध्ये बसवलं. अंकिताच्या वडिलांनाही खेचून बसमध्ये बसवण्यात आलं. या कारवाईबद्दल काँग्रेसकडून संताप व्यक्त होत असतानाच अंकिता भंडारी प्रकरण नेमकं काय आहे याबद्दल या प्रकरणामुळे पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. त्यावरच नजर टाकूयात...

उत्तराखंडमधील एक अत्यंत धक्कादायक आणि बहुचर्चित गुन्हेगारी प्रकरण म्हणून अंकिता भंडारी हत्या प्रकरणाकडे पाहिलं जातं. ऋषिकेश येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या 19 वर्षीय अंकिता भंडारी नावाच्या तरुणीची 2022 मध्ये निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. नेमकं काय झालं होतं ते पाहूयात...

अंकिता सोबत काय घडलं?

19 वर्षीय अंकिता भंडारी ही उत्तराखंडच्या पौडी गढवाल जिल्ह्यातील रहिवासी होती. ती ऋषिकेशजवळील यमकेश्वर ब्लॉकमधील 'वनंतरा रिसॉर्ट' येथे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. 18 सप्टेंबर 2022 रोजी अंकिता अचानक रिसॉर्टमधून गायब झाली. 24 सप्टेंबर 2022 रोजी ऋषिकेश येथील चिल्ला कालव्यात अंकिताचा मृतदेह पोलिसांना आढळून आला. शवविच्छेदन अहवालात तिचा मृत्यू पाण्यात बुडल्यामुळे आणि शरीरावर जखमा असल्यामुळे झाल्याचे समोर आले.

हत्या का करण्यात आली?

तपासादरम्यान,  रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि त्याचे व्यवस्थापक अंकितावर रिसॉर्टमध्ये येणाऱ्या व्हीआयपी ग्राहकांना 'स्पेशल सर्व्हिस'च्या नावाखाली पाहुण्यांच्या लैंगिक मागण्या पुरवण्यासाठी देण्यासाठी दबाव टाकत होते. अंकिताने या दबावाला स्पष्टपणे नकार दिला आणि हा प्रकार सर्वांसमोर उघड करण्याची धमकी दिली. याच रागातून आरोपींनी तिला कालव्यात ढकलून देऊन तिची हत्या केली.

मुख्य आरोपी कोण?

या प्रकरणात पोलिसांनी तीन मुख्य आरोपींना अटक केली. यामध्ये मुख्य आरोपी आणि भाजपाच्या माजी नेत्याचा मुलगा पुलकित आर्य, 'वनंतरा रिसॉर्ट'चा व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सह-आरोपी अंकित गुप्ता यांचा समावेश होता.

न्यायालयाने काय निकाल दिला?

साधारण तीन वर्ष चालेल्या न्यायालयीन लढ्यानंतर मे 2025 मध्ये कोटद्वारच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयाने या तिन्ही आरोपींना दोषी ठरवले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

आताच्या राजकीय वादाचा संदर्भ काय?

या प्रकरणात ज्या 'व्हीआयपी' व्यक्तीसाठी अंकितावर दबाव टाकला जात होता, त्या संदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते दुष्यंत गौतम यांचे नाव एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जोडले गेले.  नुकतीच दुष्यंत गौतम यांची सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीला अंकिताच्या पालकांनी तीव्र विरोध केला असून, ही नियुक्ती रद्द करावी आणि प्रकरणाची संपूर्ण सीबीआय (CBI) चौकशी व्हावी या मागणीसाठी त्यांनी दिल्लीतील इंडिया गेटवर धरणे आंदोलन सुरू केले आहे. दुष्यंत गौतम यांचे नाव अद्याप अंकिता भंडारी प्रकरणातील कोणत्याही आरोपपत्रात आलेले नाही. मात्र या प्रकरणात अलीकडेच ज्या 'व्हीआयपी'चा (VIP) उल्लेख करण्यात आलेली व्यक्ती गौतमच असल्याचा अंकिता भंडारीच्या पालकांचा आरोप आहे.

आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी इंडिया गेटवर जाऊन अंकिताच्या पालकांची भेट घेतली आणि त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. "अंकिताला न्याय मिळेल आणि तिच्या आई-वडिलांनाही न्याय मिळेल. हा लढा कितीही काळ चालला तरी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी उभे आहेत," या कॅप्शनसहीत काँग्रेसने राहुल गांधींच्या भेटीचा व्हिडीओ पोस्ट केला.

अंकिता को न्याय मिलेगा, उसके माता-पिता को इंसाफ मिलेगा। लड़ाई कितनी भी लंबी हो - नेता विपक्ष राहुल गांधी जी और कांग्रेस उनके साथ खड़ी है। https://t.co/h2vqbZ9n8e

— Congress (@INCIndia) October 14, 2026

काँग्रेस पदाधिकारी म्हणाला, हे लज्जास्पद

अंकिताच्या पालकांबरोबरच इंडिया गेट येथे आंदोलन करणारे काँग्रेस खासदार पवन खेरा, इम्रान प्रतापगढ़ी, जोथिमणी, आर सुधा आणि सुप्रिया श्रीनाटे, उदय भानू चिब, विनोद जाखड़, वरुण चौधरी यांच्यासह इतर नेत्यांना पोलिसांनी रात्री पावणे चारच्या सुमारास ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष विनोद झाकर यांनी संताप व्यक्त केलाय. "अंकिता भंडारीसाठी न्यायाची मागणी करत इंडिया गेटवर शांततेने आंदोलन करणाऱ्या तिच्या आई-वडिलांना पहाटे साडेचार वाजता पोलिसांनी ताब्यात घेणे, ही अत्यंत लज्जास्पद आणि अमानवीय कृती आहे," असं विनोद यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना, "ज्या देशात न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबाचे मध्यरात्री अपहरण केले जाते, तिथे सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणे स्वाभाविक आहे. भाजप सरकारची भूमिका स्पष्ट आहे—न्यायाची मागणी करणाऱ्या पीडितेच्या कुटुंबासोबत उभे राहण्याऐवजी, व्हीआयपींच्या संरक्षणासाठी राजकारण खेळले जात आहे," अशी टीकाही विनोद यांनी केली आहे.

अंकिता भंडारी को न्याय दिलाने की मांग को लेकर इंडिया गेट पर शांतिपूर्ण धरने पर बैठे अंकिता के माता-पिता को रात 4:30 बजे पुलिस द्वारा डिटेन किया जाना बेहद शर्मनाक और अमानवीय है। जिस देश में न्याय की गुहार लगा रहे पीड़ित परिवार को ही आधी रात में उठाया जाए, वहाँ सत्ता की संवेदनशीलता पर सवाल उठना लाज़मी है। भाजपा सरकार का रवैया साफ़ है—न्याय मांग रहे पीड़ित परिवार के साथ खड़े होने के बजाय, VIP को बचाने की राजनीति की जा रही है।

— VINOD JAKHAR (@VinodJakharIN) October 14, 2026

 या प्रकरणामध्ये आता काँग्रेसची पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
BJP
Rahul Gandhi
crime