• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

पंजाबमधील भाजप-अकाली दल युतीची घोषणा करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोठा भाऊ नेमका कोण असले हे स्पष्ट केलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 24, 2026, 16:37 IST|Updated: Nov 24, 2026, 16:45 IST
joinshare
भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'
Image Credit: भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

6,6,6,6,6,6,6,6..... वैभव सूर्यवंशीने ठोकलं सर्वात वेगवान शतक, मोडले स्टार खेळाडूंचे रेकॉर्ड

2

भाजपा-अकाली दलमध्ये मोठा भाऊ कोण असणार? अमित शाह यांनी केलं स्पष्ट, 'मुख्यमंत्री...'

3

ऐन लग्नसराईत सोनं तब्बल 26 हजार रुपयांनी स्वस्त! चांदीचे भावही घसरले; भारतात कुठे मिळालाय खरेदीदारांना दिलासा?

4

बीडमधील कार अपघातात मोठा ट्विस्ट! अल्पवयीन चालकाच्या वडिलांना अटक; मुलगाही ताब्यात; BJP नेत्याच्या मुलामुळे अपघात चर्चेत

5

दोन तरुणींमधील वाद मिटवायला गेला आणि...तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार; नागपुरमध्ये खळबळ!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पंजाबमध्ये भाजप-अकाली दल युतीची घोषणा करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अकाली दलाचा असेल. या युतीत अकाली दल 'मोठ्या भावाची' भूमिका बजावेल.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यातील युतीची घोषणा केली. दरम्यान यावेळी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराबाबतची भूमिकाही स्पष्ट केली. तसंच दोन्ही पक्षात मोठा भाऊ कोण असेल हे स्पष्ट केलं आहे. अमित शाह म्हणाले, "पंजाबमध्ये अकाली दल मोठ्या भावाची भूमिका बजावेल. आम्ही सर्व 117 जागांवर एकत्रितपणे निवडणूक लढवू. मोठा भाऊ मुख्यमंत्री देईल, म्हणजेच, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अकाली दलाचा नेता असेल."

अमित शाह यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अकाली दलासोबत समन्वय साधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा संदेश दिला आहे. मात्र, जागावाटपाबाबत अकाली दल किंवा भाजप यापैकी कोणीही अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

हे ही वाचा - देशाच्या राजकारणात मोठी घडामोड! 7 वर्षांपूर्वी युती मोडलेल्या पक्षाशी भाजपाची हातमिळवणी; 2027 ची निवडणूक एकत्र लढणार

पंजाबमधील भाजप-अकाली दल युतीची घोषणा करताना, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हे स्पष्ट केले की, मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अकाली दलाचा असेल. या युतीत अकाली दल 'मोठ्या भावाची' भूमिका बजावेल.

 

ਭਾਜਪਾ ਅਤੇ ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ ਦਾ ਗਠਜੋੜ ਸਿਆਸੀ ਗਠਜੋੜ ਤੋਂ ਅੱਗੇ ਵਧ ਕੇ ਸਾਂਝੀ ਵਿਰਾਸਤ ਅਤੇ ਸਾਂਝੇ ਸੰਕਲਪ ਦਾ ਇੱਕ ਕੁਦਰਤੀ ਗਠਜੋੜ (ਨੈਚੁਰਲ ਅਲਾਇੰਸ) ਹੈ, ਜਿਸ ਨੇ ਹਮੇਸ਼ਾ ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਸ਼ਾਂਤੀ ਅਤੇ ਤਰੱਕੀ ਨੂੰ ਪਹਿਲ ਦਿੱਤੀ ਹੈ। ਦੋਵਾਂ ਪਾਰਟੀਆਂ ਦਾ ਮੁੜ ਇੱਕ ਮੰਚ 'ਤੇ ਆਉਣਾ ਸੁਭਾਵਿਕ ਵੀ ਹੈ ਅਤੇ ਪੰਜਾਬ ਲਈ ਜ਼ਰੂਰੀ ਵੀ। ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਦੇ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਪੁਰਬ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਦਿਹਾੜੇ 'ਤੇ ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ ਦੀ NDA ਵਿੱਚ ਵਾਪਸੀ 'ਤੇ ਮੈਂ ਸਰਦਾਰ ਸੁਖਬੀਰ ਸਿੰਘ ਬਾਦਲ ਜੀ ਅਤੇ ਉਨ੍ਹਾਂ ਦੇ ਸਾਰੇ ਸਾਥੀਆਂ ਦਾ ਤਹਿ ਦਿਲੋਂ ਸਵਾਗਤ ਕਰਦਾ ਹਾਂ। ਨਸ਼ਾ-ਮੁਕਤ ਪੰਜਾਬ, ਗੈਂਗਸਟਰਾਂ ਵਿਰੁੱਧ ਸਖ਼ਤ ਕਾਰਵਾਈ ਲਈ ਮਜ਼ਬੂਤ ਕਾਨੂੰਨ ਵਿਵਸਥਾ, ਸੂਬੇ ਦਾ ਆਰਥਿਕ ਵਿਕਾਸ ਅਤੇ ਕਿਸਾਨਾਂ ਦੀਆਂ ਸਮੱਸਿਆਵਾਂ ਦਾ ਹੱਲ, ਇਹ NDA ਦੀਆਂ ਤਰਜੀਹਾਂ ਹਨ। ਭਾਜਪਾ ਅਤੇ ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ ਦੇ ਵਰਕਰ ਵਿਕਸਿਤ, ਸੁਰੱਖਿਅਤ ਅਤੇ ਖ਼ੁਸ਼ਹਾਲ ਪੰਜਾਬ ਬਣਾਉਣ ਦਾ ਸਾਡਾ ਸੰਦੇਸ਼ ਘਰ-ਘਰ ਤੱਕ ਪਹੁੰਚਾਉਣਗੇ। ਅਸੀਂ ਮੋਦੀ ਜੀ ਦੀ ਅਗਵਾਈ ਹੇਠ ਨਸ਼ਾ-ਮੁਕਤ ਪੰਜਾਬ ਬਣਾਉਣ ਲਈ ਵਚਨਬੱਧ ਹਾਂ।

— Amit Shah (@AmitShah) November 24, 2026

 

जागावाटपाबाबत अमित शाह काय म्हणाले?

अमित शाह यांनी सांगितलं की, दोन्ही पक्ष मिळून यावर निर्णय घेतील. त्यांनी पुढे सांगितलं की, आजपासून अकाली दल एनडीएचा (NDA) अधिकृत मित्रपक्ष म्हणून काम करेल. "आम्ही अनेक निवडणुका एकत्र लढवल्या आहेत, ज्यात विजय आणि पराभव दोन्ही अनुभवले आहेत; तरीही आमचे नाते अतूट राहिले आहे," असं ते म्हणाले.

दरम्यान, शिरोमणी अकाली दल (SAD) चे अध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांनी म्हटलं आहे की, पंजाबमधील ही युती लोकांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे. त्यांनी नमूद केले की, समाजातील सर्व घटकांतील आणि सर्व धर्मांतील लोकांना असे वाटते की, पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपने एकत्र यावे.

कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक लढवणार?

अमित शाह यांनी सांगितले की, ते अमली पदार्थांच्या व्यसनाचे निर्मूलन, भ्रष्टाचाराचे उच्चाटन आणि राष्ट्रवादी शक्तींना प्रोत्साहन यांसारख्या मुद्द्यांवर निवडणूक लढवतील. त्यांनी जाहीर केले की, 31 डिसेंबर 2029 पर्यंत ते पंजाबला अमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करतील.

 

ਪੰਜਾਬ ਦੀ ਬਿਹਤਰੀ ਅਤੇ ਤਰੱਕੀ ਲਈ ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ ਅਤੇ ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਦਾ ਹੋਇਆ ਗੱਠਜੋੜ! ਸ਼੍ਰੋਮਣੀ ਅਕਾਲੀ ਦਲ ਅਤੇ ਭਾਜਪਾ ਦੇ ਮੁੜ ਗੱਠਜੋੜ 'ਤੇ ਅਕਾਲੀ-ਭਾਜਪਾ ਦੇ ਸਮੁੱਚੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਬਹੁਤ-ਬਹੁਤ ਮੁਬਾਰਕਾਂ। ਪੰਜਾਬ ਦੇ ਹਿੱਤਾਂ, ਵਿਕਾਸ ਅਤੇ ਖੁਸ਼ਹਾਲੀ ਲਈ ਸਾਂਝੇ ਯਤਨਾਂ ਦਾ ਇਹ ਨਵਾਂ ਅਧਿਆਏ ਹੈ। ਪੰਜਾਬ ਦੀ ਤਰੱਕੀ ਨੂੰ ਨਵੀਂ ਰਫ਼ਤਾਰ ਦੇਣ, ਹਰ ਵਰਗ ਦੀਆਂ ਉਮੀਦਾਂ 'ਤੇ ਖਰ੍ਹੇ ਉਤਰਨ ਅਤੇ ਪੰਜਾਬ ਵਿੱਚ ਸੁਰੱਖਿਅਤ ਮਾਹੌਲ ਸਿਰਜਣ ਦੇ ਸਾਂਝੇ ਉਦੇਸ਼ ਨਾਲ ਇਹ ਗੱਠਜੋੜ ਪੰਜਾਬ ਦੇ ਭਵਿੱਖ ਲਈ ਨਵੀਂ ਦਿਸ਼ਾ ਤੈਅ ਕਰੇਗਾ।

— Shiromani Akali Dal (@Akali_Dal_) November 24, 2026

 

पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल दीर्घकाळ युतीत होते; मात्र, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्द्यांवरून 2020 मध्ये अकाली दलाने ही युती तोडली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि अकाली दल या दोघांनाही मोठा फटका बसला. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या, तर अकाली दलाने तीन जागा जिंकल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Amit Shah
Political News