SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

जळगावच्या कुटुंबातील 6 जणांना गुजरातच्या कालव्यात फेकले, मृतांबाबत अत्यंत धक्कायक माहिती उघड; पोलिसही हादरले

जळगावच्या कुटुंबातील 6 जणांना गुजरातच्या कालव्याता फेकण्यात आले. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 25, 2026, 22:16 IST | Updated: Nov 25, 2026, 22:23 IST
Join

Jalgaon Crime News : सुरतच्या बारडोली तालुक्यात उवा गावाजवळ एक क्रूर आणि धक्कादायक घटना घडली. या घटनेत एका संपूर्ण मजूर कुटुंबाला कालव्यात फेकण्यात आलं आहे. महुवाजवळील कालव्यातून आई-वडिलांसह तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर एक 13 वर्षांचा मुलगा चमत्कारिकरित्या बचावला आहे. इतर दोन मुलं बेपत्ता आहेत.  प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. मृत पती पत्नी एका गुन्ह्यातील संशयीत आरोपी आहेत. 

महाराष्ट्राच्या जळगाव येथील हे कुटुंब कामाच्या शोधात ते 21 तारखेला सूरतला गेले होते. दरम्यान कुटुंब बार्डोलीतील उवा कालव्यावर पोहोचले, तेव्हा दुसऱ्या वाहनातील चार जणांनी त्यांची कार थांबवली. त्यांनी कुटुंबातील सदस्यांनाकारमधून जबरदस्तीने बाहेर खेचले आणि त्यांना कालव्याच्या खोल पाण्यात फेकून दिले. आरोपींनी संपूर्ण कुटुंबाला कालव्यात फेकून घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यामुळे पोलिसांचे 8 पथक आरोपींच्या शोधात आहेत. 

गुजरातमधील बारडोलीजवळ कालव्यात फेकून जळगावच्या पाटील कुटुंबाची हत्या केल्याच्या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्याकांडातील मृत पती-पत्नी नितीन उर्फ नितेश पाटील आणि कल्पना पाटील हे दोघेही विमा घोटाळ्याच्या गुन्ह्यात संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे पोलीस ठाण्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या तक्रारीवरून 19 नोव्हेंबर रोजी नितीन उर्फ नितेश पाटील आणि कविता पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे विमा घोटाळ्याच्या या प्रकरणांचा आणि त्यानंतर झालेल्या नितीन उर्फ नितेश पाटील व कल्पना पाटील यांच्या हत्येचा काही परस्पर संबंध आहे का, याचा शोध आता जळगाव आणि गुजरात पोलीस घेत आहेत.

दरम्यान, या हत्याकांडातील आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. नितीन उर्फ नितेश पाटील, कल्पना पाटील आणि चार मुलांना गुजरातकडे घेऊन जाणाऱ्या वाहनाचा चालक दयानंद भदोने उर्फ खंड्या याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारोळा येथून अटक केली असून, त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. विमा घोटाळ्याचे संशयित आरोपी असलेल्या पाटील दाम्पत्याची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? विमा घोटाळ्याच्या प्रकरणाचा या हत्याकांडाशी काही संबंध आहे का? या प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासातून समोर येणार आहेत.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES