SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पराभवामुळे निराश होऊ नका, उद्यापासून आपण...', 'गोकुळ'मधील पराभवानंतर हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; 'सर्वांनी...'

गोकुळ दूध महासंघाच्या निवडणुकीच्या निकालांमुळे अनेक प्रस्थापितांना मोठा धक्का बसला असून यामध्ये राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचाही समावेश असून त्याच्या मुलाला पराभवाचं तोंड पहावं लागलं आहे. या पराभवानंतर हसन मुश्रीफ पहिल्यांदाच बोलले आहेत. ते काय म्हणालेत पाहूयात...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 01:08 PM IST | Updated: Oct 20, 2026, 01:31 PM IST
Join


संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या गोकुळ निवडणुकीमध्ये समविचारी पॅनल प्रमुख काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी एकट्याने विजयश्री खेचून आणत महायुतीची गोकुळवरील सत्ता संपुष्टात आणली. विशेष म्हणजे विरोधात तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, जिल्ह्यातील दहा आमदार अशी तगडी फळी असतानाही सतेज पाटलांच्या नेतृत्वाखालील समविचारी पॅनलने 25 पैकी 13 जागा मिळावीत बहुमत मिळविले. या पराभवानंतर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. कागल तालुक्यातील संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी हसन मुश्रीफ यांनी गोकुळच्या पराभवावर प्रतिक्रिया दिली आहे.

हसन मुश्रीफ काय म्हणाले?

गोकुळ निवडणुकीच्या निकालानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी समर्थकांना निराश न होण्याचं आवाहन केलं आहे. "गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये पराभव झाल्यामुळे निराश होऊ नका. उद्यापासून आपण पुन्हा एकदा कामाला लागू या," असं म्हणत मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांमध्ये जीव फुंकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुढे बोलताना, "पराभवाचे चिंतन करण्यासाठी उद्या मेळावा बोलवलेला आहे. त्याला सर्वांनी उपस्थित रहावे या मेळाव्यामध्ये गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाचे चिंतन करावं लागेल," असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पुढे महायुती या ठिकाणी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नक्की पाहा >>
नजर जाईल तिथपर्यंत गुलालाने रंगलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी अन्... क्षणाचाही विलंब न करता सतेज पाटलांनी पूर्ण केली कार्यकर्त्यांची 'ती' इच्छा; Video तुफान Viral

हसन मुश्रीफांचे पुत्र पराभूत

महायुतीला कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजेच गोकुळच्या निडणुकीमध्ये 12 जागांवर समाधान मानावं लागलं. तर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा मिळावीत बहुमतावर शिक्कामोर्तब केलं. या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झालाय.  शौमिका महाडिक यांनीही पराभवाला सामोरं जावं लागलं. गोकुळमध्ये तब्बल 35 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या विश्वास पाटील आणि अरुण कुमार डोंगळे यांचा देखील पराभव झाला. 

फेर मतमोजणीमुळे तणाव

गोकुळची मतमोजणी ही दुपारी चार वाजताच संपली होती, मात्र त्यानंतर महायुतीच्या शौमिका महाडिक यांनी फेर मतदान घेण्याची मागणी केली. पण त्यानंतर झालेल्या मतमोजणीत देखील महाडिक यांना पराभवाला समोर जावे लागले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार युवराज पाटील आणि विश्वास पाटील आबाजी यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, पण निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सबळ कारण न देता फेर मतमोजणी मागितल्याने दिलेला अर्ज नामंजूर केला, त्यामुळे गोकुळमध्ये समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला पॅनलला 12 जागा मिळाल्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES