• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /नजर जाईल तिथपर्यंत गुलालाने रंगलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी अन्... क्षणाचाही विलंब न करता सतेज पाटलांनी पूर्ण केली कार्यकर्त्यांची 'ती' इच्छा; Video तुफान Viral

नजर जाईल तिथपर्यंत गुलालाने रंगलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी अन्... क्षणाचाही विलंब न करता सतेज पाटलांनी पूर्ण केली कार्यकर्त्यांची 'ती' इच्छा; Video तुफान Viral

दोन्ही बाजूने प्रतिष्ठेची करण्यात आलेली ही निवडणूक अगदी शेवटच्या क्षणापर्यंत गाजली. अखेर या निवडणुकीमध्ये सतेज पाटीलच किंगमेकर ठरले असून त्यांनी महायुतीला मोठा धक्का देत एकट्याच्या जीवावर विजयश्री खेचून आणल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं

Reported BySwapnil Ghangale
Published: Oct 20, 2026, 09:24 AM IST|Updated: Oct 20, 2026, 09:31 AM IST
joinshare
नजर जाईल तिथपर्यंत गुलालाने रंगलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी अन्... क्षणाचाही विलंब न करता सतेज पाटलांनी पूर्ण केली कार्यकर्त्यांची 'ती' इच्छा; Video तुफान Viral
Image Credit: हा व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

2

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

3

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

4

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

5

'पैशांमुळे आम्हाला नाटकातून वेगळं केलं', रोहन अन् केतकीला 'आमने सामने' नाटकातून तडकाफडकी काढलं

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाला कलाटणी देणारा निकाल सोमवारी गोकुळ दूध संघात पाहायला मिळाला. एकीकडे तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, जिल्ह्यातील दहा आमदार अशी तगडी फळी असताना समविचारी पॅनल प्रमुख काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत गोकुळची सत्ता काबीज केली आहे. त्यामुळे निवडणूक निकाल जाहीर होताच समविचारी आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत आमदार सतेज पाटील यांनी आनंदोत्सव साजरा केला. या विजयोत्सवासाठी सतेज पाटलांच्या घराबाहेर हजारो समर्थकांची गर्दी पाहायला मिळाली. अंगावर गुलाल, जोरजोरात वाजणारं म्युझिक अन् त्यावर थिरकणारे कार्यकर्ते असं चित्र बराच वेळ सतेज पाटलांच्या घराबाहेर पाहायला मिळालं. स्वत: सतेज पाटीलही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे या सेलिब्रेशनदरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांची एक इच्छाही पूर्ण केली. त्यांचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय.

कार्यकर्त्यांची इच्छा केली पूर्ण

घराबाहेर झालेल्या सेलिब्रेशनदरम्यान समविचारी पॅनलच्या कार्यकर्त्यांनी सतेज पाटील यांना शड्डू ठोकण्याचे आवाहन केले. सतेज पाटील यांनी देखील क्षणाचाही विलंब न लावता लगेच शड्डू ठोकला. सध्या त्यांचा हाच व्हिडिओ कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार व्हायरल झाला आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्याची भक्कम फळी आणि दुसरीकडे सतेज पाटील यांची एकाकी झुंज हा कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरलेला असतानाच आता हा सतेज पाटलांचा शड्डू ठोकतानाचा व्हिडीओ अनेकांच्या स्टेटसवर दिसत आहे.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

सतेज पाटलांना घवघवीत यश

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निडणुकीमध्ये सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा मिळावीत बहुमत मिळविले आहे. गोकुळची मतमोजणी ही दुपारी चार वाजताच संपली होती, मात्र त्यानंतर महायुतीच्या शौमिका महाडिक यांनी फेरमतदान घेण्याची मागणी केली. पण त्यानंतर झालेल्या मतमोजणीत देखील महाडिक यांना पराभवाला समोर जावे लागले. त्यानंतर महायुतीचे उमेदवार युवराज पाटील आणि विश्वास पाटील आबाजी यांनी फेर मतमोजणीची मागणी केली, पण निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी सबळ कारण न देता फेर मतमोजणी मागितल्याने दिलेला अर्ज नामंजूर केला, त्यामुळे गोकुळमध्ये समविचारी आघाडीला 13 आणि महायुतीला पॅनलला 12 जागा मिळाल्या.

35 वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना केलं पराभूत

दोन्ही बाजूने प्रतिष्ठेचा विषय करण्यात आलेल्या या निवडणुकीत मंत्री हसन मुश्रीफांचे पुत्र नावेद मुश्रीफांचा पराभव झालाय.  शौमिका महाडिक यांनीही पराभवाला सामोरं जावं लागलं. गोकुळमध्ये तब्बल 35 वर्षे सत्ता गाजविणाऱ्या विश्वास पाटील आणि अरुण कुमार डोंगळे यांचा देखील पराभव झाला. गोकुळचे राजकारण मुंबईतून करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने मत पेटीतून दाखवून दिले असे समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी म्हटले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Satej Patil
Kolhapur
Viral News