SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षनिवडीच्या काही तासाआधी मोठा ट्विस्ट, 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

गोकुळ दूध संघाचा अध्यक्ष कोण होणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं असताना 350 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 29, 2026, 02:18 PM IST | Updated: Oct 29, 2026, 02:31 PM IST
Image Credit: gokul milk union
Join

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे अध्यक्ष निवडीवरून राजकीय रणकंदन सुरू असताना गोकुळच्या कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. गोकुळने 350 कर्मचाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

नोटीस देण्यामागील नेमकं कारण काय?

गोकुळकडून सांगण्यात आलं की, विनापरवाना गैरहजर राहिलेल्या 350 कर्मचाऱ्यांना ही कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांनी निवडणूक प्रचारात सहभागी राहण्यासाठी विनापरवाना गैरहजर राहिले होते. 1 ते 19 ऑक्टोबरदरम्यान हे कर्मचारी कामावर आले नव्हते. रजा न घेता 350 कर्मचारी प्रचाराला गेले होते.

350 कर्मचाऱ्यांमध्ये डेअरी आणि पशुखाद्य विभागातील आहेत. गोकुळने सांगितलं की, हे कर्मचारी न सांगता सुट्टीवर गेल्यामुळे कामाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी ऐनवेळी रोजंदारी कर्मचाऱ्यांकडून काम करुन घेण्याची वेळ आली. त्यासोबत एकाच वेळी 350 कर्मचारी प्रचाराला न सांगता न सु्ट्टी घेता गेल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण अचानक वाढला. त्यामुळे या  350 कर्मचाऱ्यांना प्रशासनाने नोटीसमधून सुट्टीबद्दल खुलासा करण्याचे सांगितलं आहे. 

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षची आज निवड नाहीच

दुसरीकडे गोकुळच्या अध्यक्षपदाचा पेच पाहिला मिळतोय. गोकुळच्या अध्यक्ष निवडी साठी महायुतीचे संचालक गैरहजर राहिल्यामुळे आज (29 ऑक्टोबर) कोरम अभावी सभा तहकूब झाली. त्यामुळे गोकुळच्या दूध संघाच्या अध्यक्षांची निवडणूक झाली नाही.   समविचारी पॅनेलचे प्रमुख सतेज पाटील दुपारी 4 वाजता पत्रकार बैठक घेणार आहे. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीकडून अध्यक्षपदासाठी निवडणुकीपूर्वीच गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यानुसार अध्यक्ष निवडीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, गोकुळ अध्यक्ष पदाची  सभा तहकूब केल्यानंतर, उपस्थित 13 संचालकांनी त्यांचे बहुमत असल्याने चेअरमन निवडीची कार्यवाही सुरू करणेबाबत विनंती केली तसे लेखी निवेदन दिले. त्यांचे निवेदन कारणासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अमान्य केले. दरम्यान जर सलग तीन बैठकांमध्ये जर संचालक अनुपस्थित राहिले. अशास्थिती त्यांचे संचालक पद रद्द होतं. त्यामुळे आता अध्यक्षनिवडणुकीबद्दल पुढील दोन बैठकीत काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलंय. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES