• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे अपील फेटाळले आहे. पालघर जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश कायम ठेवला आहे. विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 04:25 PM IST|Updated: Oct 29, 2026, 04:38 PM IST
joinshare
IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

2

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

3

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

4

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

5

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मुंबई : शिवसेनेतील बंडापासून अर्थात, गेली चार-साडेचार वर्षे दिवसागणिक राजकीय धक्क्यांवर धक्के बसणाऱ्या माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिवाळीचा आणखी जबरदस्त धक्का बसला आहे. ताकदवान सत्ताधीश भाजप-शिंदेंच्या शिवसेनेसोबत दोन हात करून मुंबई महापालिका निवडणुकीत जिंकलेल्या मुंबईच्या माजी महापौर, नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्याच्या प्रक्रियेवर कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल यांनी शिक्कामोर्तब केले. 

अग्रवाल यांच्यावर आशा ठेवून पद वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या राऊत यांना नगरसेवकपद गमवावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. अग्रवाल यांच्या या निर्णयामुळे महापालिकेच्या राजकारणातही राजकीय साडेसाती ठाकरेंची पाठ सोडत नसल्याचे अधोरेखित झाले आहे. राऊत यांचे नगरसेवकपद ठरविणारा आदेश अग्रवाल यांनी बुधवारी काढला. विरोधकांविरोधात रान उठविणाऱ्या राऊत यांचे पद गेल्याने महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज कमी होणार, हे नक्की आहे.

विशाखा शरद राऊत ऊर्फ विशाखा मोरेश्वर राऊत यांचे अपील फेटाळून अग्रवाल यांनी पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा 20 ऑगस्ट 2026 रोजीचा आदेश कायम ठेवला आहे. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी दिलेल्या या निर्णयामुळे संबंधित प्रकरणात अपीलकर्त्याला दिलासा मिळालेला नाही.

जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या आदेशाला आव्हान देत अपील दाखल करण्यात आले होते. मात्र, अपील प्राधिकरणाने हे आव्हान फेटाळून लावत समितीचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे या प्रकरणात अपीलकर्त्याची बाजू कमकुवत ठरली आहे.

25 दिवसांत प्रमाणपत्र जमा करण्याचे निर्देश

आदेशानुसार, संबंधित जात प्रमाणपत्र सादर केलेले नसल्यास ते आदेश प्राप्त झाल्यापासून २५ दिवसांच्या आत पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अपीलकर्त्याने दाखल केलेले स्थगिती आणि अंतरिम अर्जही निकाली काढण्यात आले आहेत.

या प्रकरणात प्रिया सदानंद सरवणकर गुरव ऊर्फ प्रिया अतुल सरवणकर गुरव यांचाही प्रतिवादी म्हणून उल्लेख आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष अनुमती याचिकेतील २२ सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशातील निर्देशांच्या अधीन राहून हा निर्णय देण्यात आल्याचे आदेशपत्रात नमूद आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का! 

जात प्रमाणपत्राच्या वादात IAS रूबल अग्रवाल यांनी विशाखा राऊत यांचे अपील फेटाळून पालघर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा आदेश कायम ठेवला आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढल्या असून, पक्षासाठी हा राजकीयदृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे.            

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Maharashtra Politics
Indian Politics
Political News