'रामायण' सिनेमाची मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे. रामायण सिनेमाबद्दल अनेक वाद सोशल मिडियावर पाहायला मिळत आहे, मागील काही दिवसांपासून या सिनेमाचे जोरदार प्रमोशन पाहायला मिळत आहे. या सिनेमाचे प्रमोशन अनेक वेगवेगळ्या देशांमध्ये करण्यात आले आहे, आता सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये असा दावा केला जात आहे की पाकिस्तानमध्ये रामायण सिनेमा प्रदर्शित होणार आहे. त्याचे कारण म्हणजेच नितेश तिवारी दिग्दर्शित या भव्य चित्रपटासंदर्भात कराचीमधील एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, नक्की झाले काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या कराचीमधील काही हिंदू चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये सिनेमामधील अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी आणि नितेश तिवारी यांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. या सिनेमाची चर्चा ही जगभरामध्ये पाहायला मिळत आहे, लोकांना पाकिस्तानमध्ये कराची येथे असलेल्या एका मंदिरामध्ये लोक रामायण सिनेमाचे पोस्टर देखील लावतानाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका पाकिस्तानी युट्यूबरने रामायण सिनेमाने बॅाक्स ऑफिस चांगली कमाई करावी आणि ऑस्करपर्यंत पोहोचावे, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
रामायण सिनमाचे प्रमोशन अनेक देशांमध्ये करण्यात आले, आता रामायण सिनेमा पाकिस्तानमध्ये राहणाऱ्यांना चित्रपटगृहांमध्ये पाहता येणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी तणावामुळे दोन्ही देशांमधील चित्रपट व्यापारावर परिणाम झाला आहे. या तणावाचा परिणाम पाकिस्तानातील भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावरही झाला आहे. त्यामुळे हा सिनेमा पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे प्रदर्शित होणार की नाही हे सांगणे कठिण आहे.
हे ही वाचा
चित्रपट प्रदर्शित होणार की नाही यासंदर्भात कोणतीही पुष्टी झालेली नाही, पण कराचीमध्ये या चित्रपटाबद्दल उत्साह मोठा आहे. जर चित्रपटाला तेथे प्रदर्शनासाठी मंजुरी मिळाली, तर पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये त्याला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.