• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'

'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'

रवींद्र धंगेकरांची पक्षविरोधी भूमिका घेऊन आधी पाठिंबा जाहीर करणं आणि विजय झाल्यानंतर आनंद व्यक्त करणं इतकी हिंमत आहे का? अशी विचारणा भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Oct 29, 2026, 05:14 PM IST|Updated: Oct 29, 2026, 05:21 PM IST
joinshare
'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'
Image Credit: प्रवीण दरेकर रवींद्र धंगेकरांवर संतापले

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

2

बँकेच्या चुकीमुळे सायबर फसवणूक झाल्यास पीडितला संपूर्ण रक्कम भरपाई द्यावी; सुप्रीम कोर्टाची सूचना

3

एकही SMS न येता सगळं अकाऊंट रिकामं; सगळी बचत क्षणात गायब! 35 कोटींच्या घोटाळ्याने PNB च्या ग्राहकांना धक्का

4

महाराष्ट्रात जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भयानक प्रकार, आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मतदाराचे अपहरण, काँग्रेस नेत्यावर गुन्हा दाखल

5

'धंगेकर तुमची कुवत आणि औकाद काय', प्रवीण दरेकर संतापले, 'फडणवीसांवर बोलताना भान ठेवा, शिंदेंनी विचार करावा तुमची...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर महायुतीमधील मतभेद समोर येत आहेत. शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी पुण्यात घेतलेल्या भूमिका आणि विधानांवरुन भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त केला आहे. धंगेकरांसारख्या फुटकळ लोकांच्या वक्तव्याला आम्ही भीक घात नाही. सूर्यावर कितीही थुंकला तरी फरक पडत नाही. उलट तुमचंच तोडं भाजेल अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. रवींद्र धंगेकरांची पक्षविरोधी भूमिका घेऊन आधी पाठिंबा जाहीर करणं आणि विजय झाल्यानंतर आनंद व्यक्त करणं इतकी हिंमत आहे का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. एकनाथ शिंदेंच्या पक्षाने आपली भूमिका माध्यमांच्या माध्यमातून अतातायीपणे मांडू नये जेणेकरुन महायुतीत वितुष्ट होणार नाही असं ते म्हणाले आहेत.

महायुती न पाळल्याचा आरोप

"मैत्रीपूर्ण लढत केली इथपर्यंत ठीक आहे. पण मित्रपक्षाला एनडीएच्या उमेदवाराला पराभूत करण्याचं काम आमच्या युतीपक्षाने केलं आहे. हे स्पष्ट आहे कारण रवींद्र धंगेकर यांनी निवडणुकीपूर्वी आवाहन केलं आहे आणि जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाचा महत्त्वाचा नेता अशी भूमिका घेतो आणि हे वरुन आदेश आल्याशिवाय होत नाही. त्यामुळे याचं अवलोकन करता शिंदेंनी लक्ष घातलं पाहिजे," अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे शेख चिल्लीसारखं आहे

"आमच्या बाजूने प्रदेशाध्यक्ष बैठक घेऊन आत्मचिंतन करतील. कारवाईची अपेक्षा आहे तिथे करतील. आमचा पक्ष समजून घेऊन दुरुस्त होणारा पक्ष आहे. पण महायुतीत राहून महायुतीचे पाय तोडायचे हे शेख चिल्लीसारखं आहे. फांदीवर बसायचं आणि आपलीच फांदी तोडायची. आपला कडेलोट होतोय याचंही भान शेख चिल्लीला नसतं, तसं होऊ नये," असा टोला त्यांनी लगावला आहे.

धंगेकरांची इतकी हिंमत आहे का?

"रवींद्र धंगेकरांनी पक्षविरोधी भूमिका घेऊन आधी पाठिंबा जाहीर करणं आणि विजय झाल्यानंतर आनंद व्यक्त करणं इतकी हिंमत आहे का? दुपारी एकजण, संध्याकाळी एकजण बोलणार. तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असं सुरु आहे. एकमेकांसोबत राहायचं आणि टीकाही करायची हे लोकांना आवडत नाही. हे योग्यही नाही. महायुतीत समन्वायतून वागली पाहिजे. क्रियाला प्रतिक्रिया मिळत असते. जर शिंदेसनेने अशा प्रकारची भूमिका घतेली तर भाजपाचे कार्यकर्ते ती मानणार नाही, त्यातून प्रतिक्रिया आली तर महायुतीचं वातावरण खराब होईल याची दक्षता सर्वांनी घ्यावी. महायुती म्हणून निवडून दिलं आहे याची जाण ठेवावी," असा सल्ला त्यांनी दिला आहे.

धंगेकर तुमची कुवत काय, तुमची औकाद काय?

"धंगेकरांच्या पोटातील ओठावर रोज येतं.. प्रत्येक पक्षाला आपला नेता मुख्यमंत्री व्हावंसं वाटतं. पण धंगेकर तुमची कुवत काय, तुमची औकाद काय? देवेंद्रजींचं नेतृत्व महारा्ट्राला माहिती आहे. महाराष्ट्र आज विकसित होत असून, अनेक योजना येत आहेत. कधी नव्हे ते महाराष्ट्र इतका पुढे जात आहे. पण त्यांच्याबाबत पोटात इतकी मळमळ, तिरसस्कर आहे की फिरुन त्यांच्या नेतृत्तावर येता. पण धंगेकरांसारख्या फुटकळ लोकांच्या वक्तव्याला आम्ही भीक घात नाही. सूर्यावर कितीही थुंकला तरी फरक पडत नाही. उलटत तुमचंच तोडं भाजेल," असा इशाराच त्यांनी दिला आहे.

"फडणवीसांवर बोलताना आपण महायुतीचा भाग आहोत याचं भान ठेवा. आम्ही कधीच तुमच्या नेतृत्वावर बोललो नाही. तुमची इच्छा काय आहे ती राहू द्या, पण फडणवीसांच्या लोकप्रिय नेतृत्वावर शिंतोडे उडवणार असाल तर खपवून घेणार नाही. शिंदेंनी याचा विचार केला पाहिजे. या वक्तव्याला पक्षाची संमती आहे का, ही पक्षाची अधिकृत भूमिका आहे का हे सांगितलं आहे. धंगेकर अधिकृत जबाबदार नेता वाटत नाही," असा टोला त्यांनी लगावला आहे.

भाजपा थिल्लर उचापती करणारा पक्ष नसून विचार करुन पावलं टाकणारा आहे. भाजपा आगतिक आणि टोकाची भूमिका घेत नाही. पण सातत्याने गृहित धरणार असाल तर त्याच पद्दतीने विचार करायला मागे पुढे पाहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pravin Darekar
shiv sena
Eknath Shinde
BJP
Devendra Fadnavis