• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये होणार आहे. तर, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार आहेत. तामिळनाडू सरकारने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 29, 2026, 06:15 PM IST|Updated: Oct 29, 2026, 06:18 PM IST
joinshare
रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने थेट फोटो दाखवला; फोटो पाहून पूर्णेकरांचा मुलगा म्हणाला...

मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने थेट फोटो दाखवला; फोटो पाहून पूर्णेकरांचा मुलगा म्हणाला...

2

तरुणाने महिला पोलिसांनाच घातला गंडा! एकाच बॅचच्या 20 जणींना बनवलं आपली गर्लफ्रेंड अन् नंतर 24...; खुलासे पाहून पोलीस खातंच हादरलं

3

दिवाळीत गोडवा कायम ठेवण्यासाठी घरी बनवा बाजारासारखे स्पॉंजी रसगुल्ले

4

रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये लागणार; सरकारची भाडेवाढीला मंजुरी

5

बँकेच्या चुकीमुळे सायबर फसवणूक झाल्यास पीडितला संपूर्ण रक्कम भरपाई द्यावी; सुप्रीम कोर्टाची सूचना

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तामिळनाडू सरकार : भारतात महागाईचा आगडोंब उसळला आहे. खाद्यपदार्थ, पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसला आहे. बस, रिक्षा यांच्या प्रवास भाड्यात वाढ झाली आहे. रिक्षाचं कमीत कमी भाडे 25 रुपयांवरुन डायरेक्ट 50 रुपये करण्यात आले आहे. तर, अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये द्यावे लागणार आहेत. तामिळनाडूमध्ये ही दुप्पट भाडे वाढ लागू करण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारने या भाडेवाढीला मंजुरी दिली आहे. 

तामिळनाडू सरकारने तब्बल 15 वर्षांनंतर राज्यातील ऑटो भाड्यांमध्ये सुधारणा केली आहे. तामिळनाडूतील ऑटो चालक सातत्याने भाडे वाढ करण्याची मागणी करत होते.  दीर्घकाळ चाललेल्या आंदोलनानंतर सरकारने अखेर भाडेवाढीची मागणी मंजूर केली आहे. 

तामिळनाडू मध्ये ऑटो रिक्षाचे नवी दर लागू झाले आहेत.  नवीन नियमांनुसार पहिल्या 1.8 किलोमीटरसाठी 50 रुपये भाडे आकारले जाईल. त्यानंतर, प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी 25 रुपये भाडे आकारले जाणार आहे.

वेटिंग आणि नाईट चार्ज किती असेल?

सरकारने  किमान घाट भाडं 1.2 पट निश्चित केले आहे.  मूळ भाडे 60 रुपये आणि अतिरिक्त वेटिंग चार्ज प्रति किलोमीटर 30 रुपये आहे. सुधारित दरांनुसार, रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंतचे भाडे नियमित भाड्याच्या दीडपट असेल. प्रति मिनिट 1 रुपया प्रतीक्षा शुल्क देखील आकारण्यात आले आहे.

सरकारने भाडे वाढीची अधिसूचना काढली आहे. यात सर्व सुधारित भाड्यांचे दर नमूद करण्यात आले आहेत. स्वतंत्र घटक म्हणून प्रतीक्षा शुल्क, रात्रीचे भाडे आणि घट शुल्क नमूद केले आहेत. राज्य परिवहन प्राधिकरण आणि संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला चेन्नई महानगर क्षेत्र आणि तामिळनाडूच्या इतर भागांमध्ये चालणाऱ्या ऑटो रिक्षांसाठी लागू दर निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. या भाडेवाढीमुळे रिक्षा प्रवासकरणाऱ्यांचा खिसा रिकामा होणार आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Marathi News