SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, हसन मुश्रीफांचा दावा, महायुतीतील नेत्यांवर निशाणा?

माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, असं विधान करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील नेत्यांवरच निशाणा साधलाय

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 22, 2026, 04:11 PM IST | Updated: Oct 22, 2026, 04:19 PM IST
Image Credit: मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं - हसन मुश्रीफ
Join

प्रताप नाईक, कोल्हापूर

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर आता पराभवाच्या कारणांवरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, असं विधान करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील नेत्यांवरच निशाणा साधलाय. तर चार हजारांहून अधिक मतदान आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या मुश्रीफांना स्वकीयांनीच तुमचा घात केला का, याचा विचार करण्याचा सल्ला सतेज पाटील यांनी दिलाय. त्यामुळे गोकुळच्या निकालानंतर महायुतीत नेमकं काय घडलं? पराभवाचं खापर कुणावर फुटणार? याची चर्चा सुरू झालीये

कोल्हापूरच्या राजकारणात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत महायुतीनं मोठी ताकद लावली. जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदार प्रचाराच्या मैदानात उतरले, मात्र, निकाल लागला आणि महायुतीच्या या सगळ्या राजकीय ताकदीला समविचारी आघाडीनं धक्का दिला. या पराभवानंतर आता महायुतीच्या गोटातच वेगवेगळे सूर उमटू लागलेत. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मुलाला पराभूत करण्यासाठी षडयंत्र झाल्याचा दावा केलाय. मुश्रीफ यांच्या या विधानातून महायुतीतील काही नेत्यांवर अप्रत्यक्षपणे खापर फोडलं जात असल्याची चर्चा सुरू झालीये. त्यामुळे मुश्रीफ यांच्या निशाण्यावर नेमकं कोण, असा प्रश्न उपस्थित होतोय

मुश्रीफ यांच्या विधानावर समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनीही सूचक प्रतिक्रिया दिलीय. चार हजारांहून अधिक मतदान आपल्याकडे असल्याचा दावा मुश्रीफ साहेब करत होते. मग एवढं मतदान असतानाही मुलाचा पराभव कसा झाला? त्याचा घात कोणी कोणी केला याचा विचार त्यांनीच करायला हवा, असा टोला सतेज पाटील यांनी लगावलाय

दरम्यान, भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळचा निकाल अनपेक्षित आणि धक्कादायक असल्याचं म्हटलंय.मतदारांपर्यंत पोहोचण्यात आणि त्यांची समजूत काढण्यात आम्ही कमी पडलो, काही गोष्टी मतदारांना पटल्या नाहीत. प्रत्यक्ष मतदानात एवढ्या मोठ्या प्रमाणात क्रॉस व्होटिंग होईल, असं वाटलं नव्हतं, अशी कबुली महाडिक यांनी दिलीय. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या षडयंत्राच्या विधानावर बोलताना, त्यांचा या संदर्भात अभ्यास झाला असेल आणि नेमकं काय घडलं, हे त्यांना कळलं असेल, म्हणून ते तसं बोलले असतील, अशी प्रतिक्रिया महाडिक यांनी दिलीय…

दुसरीकडे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही या पराभवाला मोठा धक्का म्हटलंय. मतदारांनी आम्हाला चकवा दिला, असं सांगतानाच पराभव नेमका का झाला, याची चर्चा केली जाईल असं आबिटकर यांनी स्पष्ट केलंय. हसन मुश्रीफ यांनी मांडलेल्या भूमिकेवरही चर्चा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे मुश्रीफांच्या विधानावर थेट भाष्य करण्याऐवजी पराभवाची कारणं शोधण्याची आणि त्यावर पक्षांतर्गत चर्चा करण्याची भूमिका भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याच दिसतंय

गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं बाजी मारली, पण निकालानंतर महायुतीत अविश्वासाचं वारं तयार झाल आहे.. त्यामुळेच मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या मुलाच्या पराभवासंदर्भात षडयंत्राचा भाग असल्याचा उल्लेख करत अप्रत्यक्षरीत्या स्वाकियानी घात केल्याच बोलून दाखविले आहे. त्यामुळेच गोकुळच्या पराभवाचं राजकीय विश्लेषण महायुतीचे पक्ष करत असल्याचे दिसत आहे.. या विश्लेषणातून घातपाताच राजकारण झाल्याचं महायुतीतील पक्षांना कळेल देखील, पण त्यांना महायुती म्हणून एकत्र राहण्याशिवाय पर्याय नाही.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES