SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परत येताना कार अपघातात मित्राचा मृत्यू, तर मैत्रिणीचं वसतीगृहात धक्कादायक पाऊल

महालक्ष्मीचं दर्शन घेऊन परताना कराडजवळ पुणे-बेंगळुरू महामार्गावरील अपघातात दोन दिवसांपूर्वी चार तरूणांचा मृत्यू झाला. यात पूजा मानेचा खास मित्राचा मृत्यू झाल्यामुळे तिने वसतीगृहात धक्कादायक पाऊल उचललं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 23, 2026, 04:29 PM IST | Updated: Oct 23, 2026, 04:34 PM IST
Image Credit: Satara news
Join

साताऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूजा माने या तरुणीने साताऱ्यातील यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या वसतिगृहात आत्महत्या केली आहे. पूजा ही खटाव तालुक्यातील मानेवाडी रहिवासी होती. तिने हे धक्कादायक पाऊल उचलण्यामागेही कारण अतिशय भयानक आहे. दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन परताना अपघात झाला. या अपघातात तिचा खास मित्राचा मृत्यू झाला. या घटनेचा पूजाला जोरदार मानसिक धक्का बसला होता. या धक्क्यामुळे पूजाने वसतीगृहात आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे पूजाच्या गावात आणि साताऱ्यातील तिच्या यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दसऱ्यानिमित्त सात - आठ तरूण - तरूणी कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला गेले होते. त्यानंतर परतच्या प्रवासात ट्रक आणि स्कॉर्पिओ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात साताऱ्या खटाव तालुक्यातील कातरखटाव गावातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघातात स्कॉर्पिओची अवस्था अतिशय भयानक होती. काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुल्या झालेल्या कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूलावर हा अपघात झाला होता.

मृत तरुणांचं नाव तेजस देशमुख (वय 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय 23 वर्षे), सुयश चिंचकर (वय 20 वर्षे) आणि रोहित धोत्रे (वय 21 वर्षे) असं होतं. तर ऋतुराज दुबळे (वय 21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय 20 वर्षे) आणि अमन तांबोळी (वय 23 वर्षे) हे गंभीर जखमी झाले होते. या अपघाताच्या वेळी तेजस देशमुख हा स्कॉर्पिओ गाडी चालवत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. हा अपघात रविवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास झाला होता. 

मुंबईत आयसीटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

दरम्यान माटुंगा येथील आयसीटीमध्ये इंजिनिअरिंगच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या सिद्धेश पाटील या विद्यार्थ्याने 21 ऑक्टोबरला आत्महत्या केली. रात्री साडेदहाच्या सुमारास हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन त्याने टोकाचे पाऊल उचलले. सिद्धेश मूळचा नाशिकचा होता आणि मागील काही दिवसांपासून नैराश्यावरील उपचार सुरू होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. आत्महत्येचे विचार येत असल्याचा मेसेज सिद्धेशने डॉक्टरांना केला होता. डॉक्टरांनी तातडीने कुटुंबीयांना कळवलं होतं. कुटुंबीयांनी हॉस्टेलमधील मित्रांना संपर्क साधला. मात्र, मदत पोहोचण्यापूर्वीच सिद्धेशने हे पाऊल उचलले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES