SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'पुणेरी मेट्रो' 3 नोव्हेंबरला धावणार, 23 पैकी फक्त 17 स्थानकांतच थांबणार, कोणती असतील ही स्थानके!

पुण्यात तीन नोव्हेंबर रोजी आणखी एक मेट्रो धावणार असून पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 01, 2026, 11:24 AM IST | Updated: Nov 01, 2026, 11:25 AM IST
Image Credit: pune metro line
Join

पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांची बहुप्रतीक्षित हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो अखेर 3 नोव्हेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन् होणार आहे. मात्र उद्घाटनाच्या दिवशीच या मार्गावरील २३ पैकी तब्बल सहा स्थानके बंद राहणार आहेत. कशी असेल ही मेट्रो आणि किती स्थानके असतील जाणून घेऊयात.

3 नोव्हेंबरला पुणे मेट्रोचे उद्घाटन होणार आहे मात्र 4 नोव्हेंबरपासून मेट्रो धावणार आहे. माण-हिंजवडी ते शिवाजनगरदरम्यान मेट्रो सेवा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. सुरुवातीला या मार्गावरील 23 स्थानकांपैकी 17 स्थानके सुरू होणार आहेत. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उद्घाटन सोहळा सुरू होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार उपस्थित राहतील.

जवळपास 23.203 किमी लांबीची ही मेट्रो मार्गिका पूर्णपणे उन्नत असून पुणेरी मेट्रो आणि पिंक लाइन या नावाने ओळखली जाणार आहे. माण येथून सुरू होऊन हिंजवडीच्या राजीव गांधी इन्फोटेक पार्क करुन शिवाजीनगरपर्यंत ही मेट्रो धावणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण 8,313 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

17 स्थानकांवर मेट्रो थांबणार

पहिल्या टप्प्यात केवळ 17 स्थानकांवर मेट्रो थांबणार असून, शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड आणि भोसलेनगर ही स्थानके सुरू नसणार आहेत. तर,

पहिल्या टप्प्यात खुल्या करण्यात येणाऱ्या 17 स्थानकांमध्ये माण, माण-एमआयडीसी सर्कल फेज-2, माण बस डेपो, हिंजवडी फेज-2 सर्कल-1 आणि 2, पद्मभूषण चौक, शिवछत्रपती शिवाजी महाराज चौक, हिंजवडी फेज-1, वाकड चौक, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, मिटकॉन, आर. के. लक्ष्मण संग्रहालय, औंध, सकाळनगर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, कृषी महाविद्यालय आणि जिल्हा व सत्र न्यायालय स्थानकांचा समावेश आहे.

उर्वरित सहा स्थानकांवरील काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाईल. यापैकी दोन स्थानके नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, तर उर्वरित चार स्थानके जानेवारी 2027 पर्यंत प्रवाशांसाठी खुली केली जातील. सात स्थानकांवर प्रवाशांसाठी फक्त एकच जिना खुला असेल, तर उर्वरित 10  स्थानकांवर दोन्ही जिने वापरता येतील.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES