SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा सपेन्स अखेर संपला! शिवसेना भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार?

पुणे शिक्षक मतदारसंघासाठीचा सपेन्स अखेर संपला आहे. महायुतीच्या शिवसेना भाजपात मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. प्रा. सचिन सानप यांना जाहिर पाठिंबा देण्यासाठी शिवसेना गांभिर्याने विचार करत असून लवकरच यासंबंधीची घोषणा देखील होऊ शकते.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 14, 2026, 06:39 PM IST | Updated: Oct 14, 2026, 06:45 PM IST
Join

पुणे  शिक्षक मतदारसंघ निवडणुक : महायुतीत बिघाडी नको म्हणून पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून शिवसेनेचे आरोग्यदूत मंगेश चिवटे यांनी माघार घेतली असली तरी शिवसेनेचे दुसरे मंञी उदय सामंत यांचे माजी ओएसडी प्रा. सचिन सानप यांनी माञ त्यांचा अर्ज कायम ठेवला. तेव्हाच खरंतर महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले. आज अखेर पुण्यातही 'नाशिक पँटर्न'ची पुनरावृती होताना दिसतेय कारण काल रात्री नंदनवन बंगल्यावर शिवसेनेची एक गुप्त बैठक पार पडली असून त्यात पुणे शिक्षक साठी प्रा. सचिन सानप यांना जाहिर पाठिंबा दिला जाण्याबाबत ठरल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. याबाबत गांभिर्याने विचार करत असल्याचे स्पष्ट सुतोवात शिवसेनेचे पुणे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर यांनी झी 24 तासशी बोलताना दिले आहेत.

संजय शिरसाठ यांनी मात्र, अजून काही ठरलं नसल्याचा दावा केला. प्रा. सचिन सानप यांना विचारले असता त्यांनीही होय, मी शिवसेनेकडे पाठिंब्यासाठी विनंती केली असून याबाबतच अंतिम निर्णय शिंदेसाहेबच घेऊ शकतात असं ते म्हणाले. पुण्यात नाशिक पँटर्न चालणार का? असं थेट विचारताच त्यांनी पुण्यात शिक्षक पँटर्न नक्की चालेल, असं सूचक उत्तर देत वेळ मारून नेली.

दरम्यान, पुणे शिक्षकच्या जागेवरून शिवसेनेनं सुरू केलेल्या या अघोषित बंडखोरीबाबत भाजपकडून सध्या तरी सावध पविञा घेतला जात असल्याचं सांगितले जात आहे.  तुमची तशी इच्छाच असेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या असाही निरोप सेनेला भाजपकडून दिला गेल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. थोडक्यात कायतर भाजपने देखील या मैत्रीपूर्ण लढतीची मानसिक तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे मात्र, आपण अजूनही महायुतीचेच उमेदवार असल्याचे ठासून सांगत आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघाचा विचार करायचा झालातर भाजपकडून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री समर्थक आणि कोल्हापूरच्या विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे हे मैदानात आहेत. त्यांच्या संस्थेची साधारण 6-8 हजार हक्काची मतं आहेत. पण त्यांच्याच कोल्हापुरातून काँग्रेसचे माजी मंत्री आणि संस्था चालक सतेज पाटील यांचे समर्थक आणि विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांनाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांना पवार संचलित सातारच्या रयत शिक्षक संघटनेचा पाठिंबा मिळणार हे उघड हे कारण आसगावकर हे कांग्रेससोबत मविआचे पण अधिकृत उमेदवार हे देखील कोल्हापुरचेच आहेत.

दुसरीकडे माजी आमदार दत्ता सावंत हे देखील मैदानात असून त्यांच्याकडेही सोलापूर जिल्ह्यातील हक्काची अशी काही मतं आहेत. त्याच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरचे प्रा. बी पी रोंगे देखील रिंगणात आहेत. ते भाजपकडून इच्छुक होते तर सावंत हे मविआकडून इच्छुक होते.  थोडक्यात या दोन्ही अपक्ष उमेदवारांमुळे सोलापुर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मतविभागणी होऊ शकते. 

प्रा. सचिन सानप नेमक्या कोणाच्या भरवशावर मैदानात थांबलेत?

पुणे शहरातील सिनिअर, ज्युनिअर प्राध्यापक संघटनाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा ते दावा करतात. त्यात मंगेश चिवटे यांनी नोंदवून घेतलेल्या एकनाथ शिक्षक संघटनेची मतं आपल्याला मिळावीत, यासाठी ते जोरदार प्रयत्नशील आहेत.  त्यासाठीच रात्री नंदनवनला गुप्त बैठक झाल्याचं सूत्रांकडून कळतंय. समजा शिवसेनेनं मैत्रीपूर्ण लढतीची भूमिका जाहिर केलीच तर पुणे शिक्षक मतदारसंघातली लढत नक्कीच रंगतदार होणार यात शंका नाही. कारण ती गावडे, आसगावकर, सानप आणि सावंत अशी चौरंगी लढत असेल. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES