• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल

महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल

थेट अवकाशामधून भल्या मोठ्या गारा पडल्याची घटना घडली आहे. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगले येथे एक अजब प्रकार घडला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 16, 2026, 11:18 AM IST|Updated: Nov 16, 2026, 11:27 AM IST
joinshare
महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल
Image Credit: sangali news 7 kilo block of ice fell from space straight into a field know the reason

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल

महाराष्ट्रात घडली अजब घटना! ना पाऊस, ना धुकं तरीही आकाशातून कोसळला 7 किलोचा बर्फाचा गोळा, कारण ऐकून शॉक व्हाल

2

IDBI बँकेने विक्रीपूर्वी 2 मालमत्तांची किंमत ₹2122 कोटींनी केली कमी; फेअरफॅक्सच्या व्यवहारासंदर्भात अनेक प्रश्न चर्चेत, नेमकं हे प्रकरण काय?

3

वंदे भारत ट्रेनचे ब्रेक फेल झाल्यावरही तब्बल 463 किमी धावली; रेल्वेकडून स्पष्टीकरण, नेमकं काय घडलं?

4

कधी कमी होणार पेट्रोल डिझेलच्या किंमती? पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं, वाचा आजचे ताजे इंधन दर

5

'सत्ता मिळवायची असेल तर 'ही' गोष्ट थांबवा', अमित शाहांचा राहुल गांधींना पुण्यातून सल्ला! '...नाहीतर 30 वर्षे तुमच्या पक्षाला सत्ता मिळणार नाही'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

अवकाळी पाऊस, अतिवृष्टी किंवा चक्रीवादळ आल्यांनंतर गारांचा पाऊस पडताना तुम्ही पाहिला असेलच. पण आकाश निरभ्र असताना आणि प्रचंड उकाडा असताना आणि पावसाची काहीच चिन्हे नसताना आकाशातून बर्फाचा गोळा कोसळल्याची अजब घटना महाराष्ट्रात घडली आहे. इतकंच नव्हे तर हा बर्फाचा गोळा तब्बल 6-7 किलो इतक्या वजनाचा आहे. निसर्गाच्या या चमत्कारामुळं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

थेट अवकाशामधून भल्या मोठ्या गारा पडल्याची घटना घडली आहे ती सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगले येथे एका शेतात 5 ते 7 किलो वजनाचा बर्फाचा गोळा पडला आहे. प्रचंड वेगाने आणि मोठया आवाजासह बर्फाचा गोळा जमिनीवर आदळल्याने शेतात तब्बल 1 फुटाचा मोठा खड्डा पडला.

विशेष म्हणजे, हा बर्फाचा गोळा वितळण्यासाठी सहा ते सात तास लागले. मांगले येथील मोरणा नदीकाठावर असणाऱ्या एका शेतात हा बर्फाचा गोळा अवकाशातून येऊन पडला. बर्फाचा गोळा खाली आदळला तेव्हा मोठा आवाज झाल्याचंही शेतकरी सांगतात.  

मोठ्या आवाजासह हा गोळा शेतात येऊन पडल्यानंतर गावातल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेऊन पाहिले असता हा बर्फाचा गोळा आढळून आला. रविवारी सकाळी साडेआठ वाजता सुमारास ही घटना घडली आहे. दुर्मिळ घटनेमुळे परिसरात आश्चर्य आणि कुतूहल व्यक्त होत आहे.

घटनेचे प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आकाशातून सुरुवातीला ड्रोनसारखी एक वस्तू खाली येताना दिसली. त्यानंतर काही क्षणांतच ती वस्तु प्रचंड वेगाने शेतात आदळळी. त्याचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील शेतकरीही हादरले. तिथे जाऊन पाहिल्यावर मोठा बर्फाचा गोळा होता. शेतात तिथे मोठा खड्डा पडला होता.

नोव्हेंबर महिन्यात सध्या धुके आणि कडाक्याची थंडी नसतानाही आकाशातून बर्फाचा गोळा पडल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. तर, तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळा पावसाळी ढगांशिवाय वातावरणातील बाष्प एकत्र येऊन बर्फाचे मोठे गोळे तयार होतात. त्याचे वजन काही ग्रॅमपासून ते 50 किलोपर्यंत असू शकते. त्याला मेगाक्रायोमोटिओर असं म्हणतात. निरभ्र आकाशातील वातावरणातील विशिष्ट दुर्मिळ बदलांमुळं ते तयार होत असतात.

दरम्यान, काहींना हवामानातील अनपेक्षित बदलांमुळं अशा घटना होऊ शकतात, असं म्हटलं आहे. वातावरणाच्या वरच्या थरातील अत्यंत कमी तापमानामुळं निर्माण झालेले बर्फाचे गोळे गुरुत्कर्षणामुळं खाली आदळण्याची शक्यता असते.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sangli
Maharashtra News
Weather