SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरणकुमार लिंबाळेंच्या नावाची घोषणा; जाणून घ्या त्यांचा साहित्यिक प्रवास

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शतक महोत्सवी२ वर्षात अध्यक्षपदी निवड झालेले डॉ. शरणकुमार लिंबाळे आहेत तरी कोण? त्यांनी कोणती पुस्तके लिहिली आहेत? जाणून घ्या सविस्तरपणे...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 24, 2026, 13:46 IST | Updated: Nov 24, 2026, 14:00 IST
Image Credit: जाणून घ्या डॉ. शरणकुमार लिंबाळेंबद्दल (फोटो फेसबुकवरुन साभार)
Join

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शतक महोत्सवी वर्षात अध्यक्षपदी सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, कवी, समीक्षक आणि आंबेडकरी विचारवंत डॉ. शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाली आहे. 100 वं मराठी साहित्य संमेलन जानेवारी 2027 मध्ये पुण्यात होणार असून, या ऐतिहासिक संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान सोलापूर जिल्ह्यातील हन्नूर गावी जन्मलेल्या शरणकुमार लिंबाळेंना मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवड पुण्यात झालेल्या महामंडळाच्या बैठकीत करण्यात आली. डॉ. शरणकुमार लिंबाळे यांचा अल्पपरिचय जाणून घेऊयात...

कोण आहेत डॉ. शरणकुमार लिंबाळे?

दलित साहित्यातील त्यांच्या योगदानाबद्दल आणि परखड लेखनासाठी ओळखले जाणारे डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून मराठी विषयात एम.ए. आणि 'मराठी दलित साहित्य आणि अमेरिकन ब्लॅक साहित्य' या विषयावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. पुढे त्यांनी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्राध्यापक आणि संचालक म्हणून काम पाहिले असून त्यांनी 40 हून अधिक पुस्तकं लिहिली आहेत. 

आत्मचरित्र प्रचंड गाजले

1984 मध्ये प्रकाशित झालेले 'अक्करमाशी' हे त्यांचे आत्मचरित्र प्रचंड गाजले. त्याचे इंग्रजीमध्ये 'द आऊटकास्ट' नावाने भाषांतरही झाले. इंग्रजीबरोबरच इतर अनेक भाषांमध्ये डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या आत्मचरित्राचं भाषांतर झाले आहे. 

गाजलेली पुस्तकं कोणती?

उद्रेक
उपल्या
ओ
गावकुसाबाहेरील कथा
झुंड
दंगल
दलित आत्मकथा - एक आकलन
दलित पँथर
दलित प्रेमकविता
दलित ब्राह्मण
दलित साहित्य आणि सौंदर्य
दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र
पुन्हा अक्करमाशी
प्रज्ञासूर्य (डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र)
बहुजन
ब्राह्मण्य
भारतीय दलित साहित्य
भिन्नलिंगी
राणीमाशी
रिपब्लिकन पक्ष वास्तव आणि वाटचाल
वादंग
विवाहबाह्य संबंध नवीन दृष्टिकोन
शतकातील दलित विचार
साठोत्तरी मराठी वाड्मयातील प्रवाह
सांस्कृतिक संघर्ष
साहित्याचे निकष बदलावे लागतील
हिंदू
ज्ञानगंगा घरोघरी

या कादंबऱ्याबरोबरच 'दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र' हा समीक्षाग्रंथ विशेष प्रसिद्ध आहे. 

पहिले दलित साहित्यिक ज्यांना...

सहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2020 मध्ये डॉ. शरणकुमार लिंबाळे यांच्या 'सनातन' या ऐतिहासिक कादंबरीसाठी के. के. बिर्ला फाऊंडेशनचा प्रतिष्ठित 'सरस्वती सन्मान' देऊन त्यांना गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले दलित साहित्यिक आहेत. 

कधी आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन? ऐतिहासिक महत्त्व काय?

शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात होणार आहे. संमेलनाच्या संभाव्य तारखा 28 ते 31 जानेवारी 2027 आहेत. मात्र पुण्यातील सायकल स्पर्धेच्या समारोपामुळे तारखांमध्ये एक दिवस अलीकडे बदल होण्याची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जात आहे. पुण्यातील या 1878 मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुण्यातील पहिल्या संमेलनानंतर शतक मोहोत्सवी संमेलनही पुण्यातच होत आहे. तब्बल 149 वर्षांच्या प्रवासानंतर शंभरावे संमेलन पुन्हा पुण्यात होत असल्याने या संमेलनाला वेगळे महत्व प्राप्त झालं आहे. या संमेलनात 16 विविध व्यासपीठांवर परिसंवाद, कविसंमेलने, पुस्तक महोत्सव आणि मराठी भाषेच्या वैश्विक प्रवासाचा वेध घेणारे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES