कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीवरून राज्य सरकारवर पुन्हा एकदा आमदार सतेज पाटील यांनी प्रहार केला आहे.सरकारने 4 संचालकांसाठी झालेल्या कोर्टातील सुनावणीसाठी युक्तीवाद करणाऱ्या वकीलाला तब्बल 80 लाख दिली अशी माहिती समोर आली. त्यानंतर सतेज पाटील आक्रमक झाले असून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यात भीषण दुष्काळ असताना सरकाराने फक्त एका युक्तीवादासाठी 80 लाख खर्च केला. ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. मुकुल रोहतगी यांना कोर्टात एक युक्तीवादासाठी 80 लाख दिलेत.
गोकुळमधील समविचारी पॅनेलचे नेतृत्त्व करणाऱ्या आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी राज्य सरकारला धारेवर धरलंय. राज्य सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल 80 लाख रुपयांची उधळपट्टी करण्यात आली.
दुष्काळात ८० लाखांची उधळपट्टी गोकुळमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी साम, दाम, दंड आणि कपटाचा वापर करणाऱ्या महायुती सरकारचा कारनामा पाहा! एकीकडे राज्यात दुष्काळामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे, विकासकामांसाठी निधी कमी पडत आहे. अशा परिस्थितीत गोकुळमधील चार शासननियुक्त संचालकांच्या नियुक्तीचे समर्थन करण्यासाठी वकिली शुल्कापोटी सरकारी तिजोरीतील तब्बल ८० लाख रुपयांची उधळपट्टी ? #लक्षातठेवलंय२०२९
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) November 23, 2026
कोल्हापूर दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत एकूण 25 जागांसाठी लढत झाली होती. यापैकी 13 जागांवर सतेज पाटील यांच्या महायुतीचे आणि 12 जागांवर महायुतीचे संचालक निवडून आले होते. त्यामुळे गोकुळचा अध्यक्ष समविचारी पॅनेलचा होईल, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, महायुती सरकारने ऐनवेळी नियम बदलत गोकुळवर चार शासकीय संचालकांची नियुक्ती केली होती. या संचालकांना मतदानाचा अधिकारही बहाल करण्यात आला होता. याविरोधात समविचारी आघाडीने उच्च न्यायालयात धाव घेत शासकीय संचालकांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी केली होती. त्यामुळे ही न्यायालयीन लढाई प्रतिष्ठेची झाली होती. तेव्हा राज्य सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांची वकील म्हणून नेमणूक करण्यात आली होती.