SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेवटचं लोकेशन ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकासोबत घडलं भयंकर, 1200 फूट खोल दरीत...

माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात अपघात भरधाव कार खोल दरीत कोसळली. अपघातात गोरेगाव येथील उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 22, 2026, 14:35 IST | Updated: Nov 22, 2026, 14:40 IST
Image Credit: Missing for two days location traced to Tamhini Ghat entrepreneur Shrinivas Bendkhale found in vally
Join

माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात रायगडमधील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू झाला आहे. बेंडखळे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

श्रीनिवास बेंडखळे शनिवारी पहाटे पासून ते आपल्या कारसह बेपत्ता होते. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात होते. त्या भागात शोध घेतला असता खोल दरीत त्यांची गाडी आढळून आली. पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात तब्बल 1200 फूट खोलदरीत त्यांची कार सापडली. रात्री उशिरापर्यंत SVRSS आणि शेलार मामा या रेस्क्यू टीम कडून हे शोधकार्य सुरू होते त्यानंतर या दोन्ही रेस्कु टीमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

श्रीनिवास बेंडखळे हे  रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एक प्रसिद्ध उद्योजक होते. . मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. पोलीस तपासात त्यांच्या वाहनाचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळून आल्यानंतर शोधकार्याला गती मिळाली. त्यानंतर पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात 1200 फूट खोल दरीत त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

अथक प्रयत्नांनंतर या दोन्ही रेस्क्यू टीमला मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पौंड पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला असून, या दुर्घटनेबाबत पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा खोल दरीतून बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढला. ही कार नेमकी कशी आणि कोणत्या कारणामुळे दरीत कोसळली, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर महाडमध्ये भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर रायगडच्या महाडमध्ये भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने महामार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, धडकेनंतर कारही पलटी झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कोकण लेनवर हा अपघात घडला. राकेश जगोटीया असं मृत पादचाऱ्याचं नाव असून तो मुंबईतील चेंबूर इथला राहणारा आहे . दरम्यान, या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES