SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कर्जतमध्ये राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच मोठा गोंधळ! सभा सुरु होण्याआधीच घडलं असं काही

कर्जतमध्ये राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच मोठा गोंधळ झाला. सभा सुरु होण्याआधीच सभास्थळी नेमकं काय घडलं?

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 28, 2026, 06:54 PM IST | Updated: Oct 28, 2026, 06:56 PM IST
Join

Raj Thackeray Karjat Daura : कर्जतमधील वृक्षतोडीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांनी कर्जतमधील सायडोंगरावर जात पाहणी केली. तसेच यावेळी त्यांनी डोंगरावर वृक्षारोपण देखील केले. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात भेट देत प्रकल्पग्रस्तांसोबत संवाद साधला. राज ठाकरेंची कर्जतमध्ये सभा देखील आहे. सभेमधून राज ठाकरे वृक्षतोडीबाबत पुढील भूमिका मांडण्याची शक्यता. मात्र, कर्जतमध्ये  राज ठाकरेंचे भाषण सुरु होण्याआधीच कनेक्शन बंद झाले. सभा सुरु होण्याआधीच मोठा गोंधळ निर्माण झालाय यामुळे मानसे नेते संतपाले. 

राज ठाकरेंची सभा सुरु होण्यापूर्वी मोठा गोंधळ

सभा सुरु होण्यासाठी अवघा काळी वेळ शिल्लक असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सभेला पुरविण्यात आलेल इंटरनेट बंद झाले.  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. सभास्थळी LAN केबल द्वारे जे इंटरनेटचे आयोजन करण्यात आले आहे. ते बंद केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.   

हे सरकार घाबरले का? संदीप देशपांडे यांचा सवाल  सध्यस्थित मोबाईल इंटरनेट सुरुळीत पण. सभेसाठी घेण्यात आलेल इंटरनेट कनेक्शन बंद करण्यात आल्याचा आरोप आणि माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. 

मनसे नेत्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर इंटरनेट सेवा सुरु झाली आणि सभेला सुरुवात झाली. इंटरनेट बंद झाल्यामुळे सभा सुरु होण्यासा उशीर झाल्याचा दावा मनसे नेत्यांनी केला आहे. 

वृक्षतोडीला संदीप देशपांडे, अविनाश जाधवांचा विरोध 

झाडं कापुन दुसरीकडे झाडं लावणार , मग जिथे झाडं लावणार तिथेच प्रकल्प का नेत नाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे,  अविनाश जाधव यांनी उपस्थित केला. तसंच दिल्लीतले दोन गुजराती सह्याद्रीचं भवितव्य ठरवत असल्याचं वक्तव्य  संदीप देशपांडेंनी केले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES