SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

हॉटेल रूममध्ये पोहोचल्यावर आधी टॉवेलने TV झाका, कारण...; निवृत्त कर्नलचा सल्ला, 'रात्री झोपताना तुमचा फोन...'

तुम्ही हॉटेलमध्ये चेकइन केल्यानंतर रुमवर गेल्यावर आधी तिथे टीव्ही असेल तर तो मोठ्या आकाराच्या टॉवेलने का झाकला पाहिजे हे गुप्तचर यंत्रणेसाठी काम केलेल्या निवृत्त कर्नलने सांगितलंय.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 25, 2026, 13:05 IST | Updated: Nov 25, 2026, 13:37 IST
Image Credit: हा सल्ला देण्यामागील कारण काय? (फोटो सोशल मीडिया आणि 'एआय'वरुन साभार)
Join

तुम्हाला भटकंतीची आवड आहे का? तुम्ही अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी जाता तेव्हा हॉटेलमध्ये रुम भाड्याने घेऊन राहता का? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तुम्ही अशा ठिकाणी राहताना अधिक सावधपणे राहण्याची गरज असल्याचा इशार नुकताच 'एएनआय'च्या पॉडकास्टमध्ये भारतीय लष्कराच्या गुप्तचर विभागात काम केलेल्या कर्नल हनी बक्षी यांनी दिला. कशाप्रकारे एखाद्या सामान्य व्यक्तीवर पाळत ठेवून महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत पोहोचलं जातं याबद्दल बक्षी बोलत होते.

रोजच्या जीवनातील उदहारण देत पटवून दिलं

बक्षी यांनी अनेक सामान्यांना वाटतं की आपला फोन कोण कशाला हॅक करेल? असं वाटत असल्याचं सांगितलं. मात्र फोनमधील डेटा लिक होतो तेव्हा त्या फोनच्या कॉनटॅक्ट लिस्टमधील अनेकांचे नंबर आणि संवेदनशील माहितीही या सायबरचोरांकडे जाते, असं बक्षी म्हणाले. दैनंदिन आयुष्यातील काही अगदी साधी वाटणारी उदाहरणं देत बक्षी यांनी आपलं म्हणणं पटवून दिलं.

वायफायचं उदाहरण दिलं

"तुमच्या घरी वायफाय आहे का? तुम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर वायफाय कनेक्ट करताना 'इन्सिक्युअर' म्हणजेच सुरक्षा नाही असं लिहून येतं आधी," असं सांगताना बक्षी यांनी अशा माध्यमातूनही फोनमधील डेटा चोरीला जाऊ शकतो. "मी काही पाहिल्यानंतर दोन तासांनी माझा मित्र मला तिच गोष्ट पाठवतो. त्यामुळे तुमची कॉनटॅक्ट लिस्टही कॉम्प्रमाइज होते हे स्पष्टच आहे. आता समजा असा कर्नलाचा पोरगा एखाद्या असुरक्षित वायफायवरून फोन कनेक्ट करुन स्वत:च्या घरी जाऊन घरातील वायफानला फोन कनेक्ट करणार तेव्हा त्याच वायफायवर जनरलचा फोन कनेक्ट असणार आणि डेटा कॉम्प्रमाइज होणार," असं बक्षी म्हणाले.

हॉटेलमध्ये गेल्यावर टीव्ही टॉवेलने झाका

पुढे बोलताना त्यांनी हॉटेलमध्ये राहत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे हे सांगितलं. "तुम्ही हॉटेलमध्ये रुमवर गेल्यानंतर तुमच्या उजवीकडे किंवा डावीकडे टॉयलेट असतं. आतमध्ये जा. तिथला सर्वात मोठ्या आकाराचा टॉवेल घ्या आणि तो टीव्हीवर टाकून द्या. त्या टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यावर हेरगिरी केली जात असणार. तुमच्या रुममध्ये टीव्ही असेल तर तो काढून टाका. रात्री झोपताना तुमचा फोन ड्रॉव्हरमध्ये ठेवा. राष्ट्रीय सुरक्षा वेगळी गोष्ट झाली पण तुमची स्वत:ची सुरक्षा महत्त्वाची आहे. कोणीतरी तुम्हाला एखाद्या दिवशी कशाच्या तरी माध्यमातून बॅकमेल करेल," असा इशारा बक्षी यांनी दिला.

बक्षी यांनी पूर्वी गुत्पचर यंत्रणेसाठी काम केलं असल्याने यंत्रांच्या माध्यमातून कशी हेरगिरी केली जाऊ शकते हे त्यांनी अगदी साध्या साध्या गोष्टींच्या माध्यमातून सोप्या शब्दात सांगितलं.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES