SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'आमचा राम सरळ, तुमचा कृष्ण वाकडा...'; वाद्रग्रस्त विधानानंतर बागेश्वर बाबाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मी फक्त...'

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाने मोठा वाद उफाळला आहे. काय घडलं नेमकं?

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 04, 2026, 07:21 AM IST | Updated: Nov 04, 2026, 07:24 AM IST
Image Credit: Dhirendra Krishna Shastri
Join

बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान राम यांची केलेली तुलना आणि श्रीकृष्णाबाबत केलेले वादग्रस्त वक्तव्य यामुळं त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. या वादावर धीरेंद्र शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते बागेश्वर बाबा?

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे सुरू असलेल्या रामकथेदरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या रुपाची, स्वभावाची तुलना केली होती. इतकंच नव्हे तर श्रीकृष्णाची नक्कलदेखील करुन दाखवली होती. त्यामुळं त्यांच्या या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता.

बागेश्वर बाबा यांनी म्हटलं होतं की, 'तुमचे ठाकूरजी प्रत्येक फोटोत इकडे-तिकडे पाहतात. ते उभे राहिले तरी तीन ठिकाणी वाकलेले असतात. त्यांचे पाय एकमेकांवर असतात. कंबर वाकलेली असते आणि मानही वाकवून ते बासरी वाजवतात.'

इतकंच नव्हे तर, 'प्रभू श्रीरामाशी त्यांनी तुलनाही केली आहे. आमचे प्रभऊ सरळ उभे राहतात, ते सरळ पाहतात, त्यांचे नावही सरळ आणि सरळ चालतात. तुमचे वाकडे उभे राहतात. वाकडे पाहतात आणि वाकडे चालतात. तसंच, बासरी वाजवणे हा एक खेळ आहे, पण धनुष्य चालवणे हा काही खेळ नाही,' असंही त्यांनी म्हटलं होतं.

बागेश्वर बाबा यांनी केलेल्या वक्तव्यामुळं मोठा वाद निर्माण झाला होता. या विधानानंतर नेते, मथुरेतील संत आणि विरोधकांकडून तीव्र संताप व्यक्त केला गेला. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी देखील या विधानाचा निषेध करत अशा प्रवृत्तींवर आजीवन बंदी घालण्याची मागणी केली. वाढता विरोध पाहता बागेश्वर बाबा यांनी जाहीर माफी मागितली आहे.

धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे की, 'त्यांच्या विधानाचा वेगळा अर्थ काढण्यात आला. तसेच, त्यांच्या शब्दांनी कोणालाही दुखावले असल्यास, त्यांनी हात जोडून माफीही मागितली. माझा कोणत्याही देवाचा अनादर करण्याचा किंवा समाजात फूट पाडण्याचा कोणताही हेतू नव्हता. आपण स्वतः कृष्णभक्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.'
धीरेंद्र शास्त्री यांनी सुरुवातीला एका व्हिडिओद्वारे आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. त्यानंतर, जेव्हा ते व्यासपीठावर कथा सांगण्यासाठी बसले, तेव्हा त्यांनी पुन्हा माफी मागितली. त्यांनी लाखो लोकांना सांगितले की, ते केवळ देशभक्ती आणि रामावरील प्रेमाबद्दलच बोलले होते, त्यामुळे त्यांनी लोकांना माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नये अशी विनंती केली.

धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे की, 'मी ते भावनेच्या भरात बोललो, मला ते बोलायला नको होतं, पण आपण काय करू शकतो? कधीकधी आपण भावनेच्या भरात काहीतरी करतो. क्षणभरात आपण काहीही बोलून जातो. पण आमचा हेतू कोणालाही विरोध करण्याचा नसतो. आता, आम्ही स्वतः ठाकूरजींचे भक्त आहोत. मी फक्त एवढंच म्हणालो की ठाकूरजी वाकडे आहेत, रामजी सरळ आहेत, आणि त्यावरूनच लोकांनी टीका करायला सुरुवात केली.'

ते पुढे म्हणाले, 'आम्ही ठाकूरजींच्या विरोधात नाही. आम्ही ते भावनेच्या भरात बोललो, याला व्यास अवस्था म्हणतात, आमची तुम्हाला विनंती आहे की त्याचा चुकीचा अर्थ लावू नका.'

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES