SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

सोनं 64 हजार तर चांदी 2.82 लाखांनी सस्त; 2026 सर्वात मोठी घरसण, सोनं चांदीचे इतके कमी रेट पाहून शॉक व्हाल

Gold-Silver Rates Crash : भारतीय गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. सराफा बाजारात 2026 सर्वात मोठी घरसण झाली आहे. उच्चांकी दरापासून सोन्याचे दर 64 हजार रुपयांनी तर चांदीचे दर 2.82 लाखांनी घरसले आहेत.  अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 2.90 टक्के आणि चांदीच्या दरात 5 टक्के पेक्षा जास्त घसरण झाली. सोन्याचा दर 103 डॉलरने घसरून प्रति औंस 3463 डॉलरवर आला आहे.  चांदीचा दर प्रति औंस 38 डॉलरवर आला. भारतीय बाजारात सोनं चांदी खूपच स्वस्त झाली आहे.  

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Nov 25, 2026, 22:58 IST | Updated: Nov 25, 2026, 23:04 IST
Join

Gold-Silver Rates Crash : भारतीय गोल्ड मार्केट क्रॅश झाले आहे. सराफा बाजारात 2026 सर्वात मोठी घरसण झाली आहे. उच्चांकी दरापासून सोन्याचे दर 64 हजार रुपयांनी तर चांदीचे दर 2.82 लाखांनी घरसले आहेत.  अमेरिकेतील महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. जागतिक बाजारात सोन्याच्या दरात 2.90 टक्के आणि चांदीच्या दरात 5 टक्के पेक्षा जास्त घसरण झाली. सोन्याचा दर 103 डॉलरने घसरून प्रति औंस 3463 डॉलरवर आला आहे.  चांदीचा दर प्रति औंस 38 डॉलरवर आला. भारतीय बाजारात सोनं चांदी खूपच स्वस्त झाली आहे. 
 

जानेवारी 2026 मध्ये सोन्याच्या दराने विक्रमी उच्चांकी दर गाठला होता. सोन्याचा दर 1.83 लाखांपर्यंत पोहचला होता. तर चांदीने  4,20,048 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. आता मात्र, सोनं 64 हजार तर चांदी 2.82 लाखांनी सस्त झाली आहे. 

भारतीय वायदे बाजार, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं चांदीचे दर गडगडल्याचे दिसत आहे. 25 नोव्हेंबर रोजी  सोन्याच्या दरात 3,700 पेक्षा जास्त घसरण झाली. सोन्याच दर प्रति 10 ग्रॅम 1.18 लाख या दिवसाच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. चांदीचा दरही प्रति किलो 8100 रुपयांपेक्षा जास्त घसरला आहे. चांदीचा दर प्रति किलो 1.37 लाख रुपयांवर पोहोचला. 

रुपया मजबूत झाल्यामुळे आणि जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये मंदीचा कल कायम राहिल्यामुळे, बुधवारी चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. चांदीचा दर 7,000  रुपयांनी घसरून प्रति किलोग्राम 1.50 लाख रुपयांवर पोहोचला, जो एका वर्षातील नवा नवा नीचांक आहे. सोन्याचा दरही घसरून प्रति 10 ग्रॅम 1.26 लाख रुपयांवर आला. 

अमेरिकेतील महागाईने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार, वैयक्तिक उपभोग खर्चातील (PCE) महागाई वार्षिक 3.8 टक्क्यांपर्यंत वाढली असून, ती मे महिन्यानंतरची सर्वोच्च पातळी आहे. अन्न आणि ऊर्जा खर्च वगळून मोजली जाणारी कोअर PCE महागाईसुद्धा 3.3 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. ही गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी असून, ती बाजाराच्या अपेक्षांपेक्षा खूप जास्त आहे. 

अमेरिकेच्या वाणिज्य विभागाने बुधवारी अहवाल सादर केला. या अहवालानुसार अर्थतज्ज्ञांनी 0.4 टक्के वाढीचा अंदाज वर्तवला होता.  ऑक्टोबरमध्ये टिकाऊ वस्तूंच्या मागणीत केवळ 0.2 टक्क्यांची वाढ झाली. सप्टेंबरमध्ये हा आकडा पूर्वी 2.0 टक्क्यांपर्यंत सुधारित करण्यात आला होता. डिसेंबरमध्ये यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी एक वाढ होण्याची शक्यता आहे.  असल्याने त्याचा परिणाम सोने आणि चांदीवरही होत आहे. ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती सतत घसरण होत आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES