2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणारे ग्राहक दर जाणून शॉक
सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल? हे जाणून ग्राहक शॉक झाले आहेत.
Gold Rate : ऑक्टोबर 2026 मध्ये सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण झाली. सोन्याच्या दरात झालेली घसरण सातत्याने सुरुच आहे. सोन्याचे दर उच्चांकी दरापेक्षा 46,000 रुपयांनी तर चांदीचे 2.40 लाखांनी स्वस्त झाले आहेत. यामुळे दसरा आणि दिवाळीला सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. 2026 मध्ये धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन आणि पाडव्याला सोनं खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळाला असली तरी 2027 च्या दिवाळीत सोन्याचा दर किती असेल हे जाणून ग्राहक शॉक झाले आहेत.
लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी म्हणजेच 7 नोव्हेंबर रोजी 10 ग्रॅम 24 -कॅरेट सोन्याचा दर 2,677 रुपयांनी घसरून सुमारे 1.41 लाख रुपयांवर आला. चांदीचा दर 4,432 रुपयांनी घसरली. चांदीचा दर प्रति किलो 1.83 लाख झाला आहे. 31 डिसेंबर 2025 रोजी चांदीचा दर 2.30 लाख रुपयांवरून घसरून 1.83 लाख रुपये प्रति किलो झाला. 29 जानेवारी 2026 रोजी सोन्याने 1.76 लाख रुपयांचा तर, चांदीने 3.86 लाख रुपयांचा सर्वकालीन उच्चांक गाठला होता.
2027 दिवाळीत सोनं महाग होणार की स्वस्त?
सोनं चांदीच्या दरात सध्या प्रचंड मोठी उलथापालथ सुरु आहे. सोनं चांदीच्या दरात पडझड कायम राहणार आहे. सोन्याच्या दरात प्रचंड तेजी येण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे. पुढील वर्षभरात सोन्याच्या किंमती 20 ते 40 टक्क्यांनी वाढू शकतात. 2027 च्या दिवाळीपर्यंत 1 तोळा सोन्याच्या दर 1.75 लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकतो असा तज्ञांचा अंदाज आहे. सोन्याचा आंतरराष्ट्रीय दर प्रति औंस सुमारे 4,950 डॉलर राहण्याचा अंदाज आहे.
10 वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 4.77 पट वाढ
सोनं हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. मागील 10 वर्षांत सोन्याच्या दरात सुमारे 4.77 पट वाढ झाली आहे. सोन्याने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. 2016 मध्ये दिवाळीत सोन्याचा दर 30,590 तोळा होता. 2026 च्या दिवाळीत सोन्याचा दर 1,45,915 पोहचला आहे. 10 वर्षात सोन्याच्या दरात ४.७७ पटीने वाढ झाली आहे. 2016 मध्ये सोन्यात
1 लाखांची गुंतवणक करणाऱ्या फायदा झाला आहे. 1 लाखात खरेदी केलेल्या सोन्याचे मूल्य 4.77 लाख झाले आहे.
सोन्याच्या दरात अस्थिरता का आली आहे?
अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे सोन्याच्या दरात अस्थिरता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने 2027 मध्ये व्याजदर वाढवण्याऐवजी ते कमी करण्याचा निर्णय घेतला तर पुन्हा एकदा सोन्याचा दरात भूकंप येऊ शकतो. कमी व्याजदरांमुळे डॉलर आणि बॉण्डवरील परतावा कमकुवत होऊ शकतो. अशा परिस्थितीत, गुंतवणूकदारांसाठी सोने अधिक आकर्षक ठरू शकते. चांदीच्या दरातही वाढ होण्याची शक्यता आहे.