SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भारतातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दिवाळीआधीच बँक खात्यात ₹2000;मोबाईलवर असे तपासा

पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता जारी करण्यात आलाय. देशातील 9.34 कोटी शेतकऱ्यांना ₹2000 वितरित करण्यात आले आहेत. तुमच्या खात्यात पैसे आले का?, मोबाईलवर पेमेंट स्टेटस कसा तपासायचा जाणून घ्या.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Oct 30, 2026, 03:05 PM IST | Updated: Oct 30, 2026, 03:24 PM IST
Image Credit: पीएम किसान निधी
Join

दिवाळीपूर्वी देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारकडून आनंदाची बातमी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 24 वा हप्ता जारी केला. या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात प्रत्येकी 2000 रुपये जमा करण्यात आले आहेत. असे असले तरी तुमच्या खात्यात पैसे आले आहेत का, याची खात्री कशी करायची? हप्ता अडकला असेल तर काय तपासायचे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

9.34 कोटी शेतकऱ्यांना वितरण

गुजरातमधील बनासकांठा येथे आयोजित कार्यक्रमातून पंतप्रधानांनी पीएम किसान योजनेचा 24 वा हप्ता जारी केला. यावेळी देशातील ९.३४ कोटी पात्र शेतकरी कुटुंबांसाठी एकूण 18680 कोटी रुपये वितरित करण्यात आले. प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात 2000 रुपये थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBT पद्धतीने पाठवण्यात आले आहेत. मागील 23 वा हप्ता 20 जून 2026 रोजी वितरित झाला होता. त्यावेळी 9.44 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना लाभ मिळाला होता.

वर्षाला मिळतात सहा हजार रुपये

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र जमीनधारक शेतकरी कुटुंबांना वर्षभरात एकूण सहा हजार रुपये दिले जातात. ही रक्कम प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते. म्हणजे साधारण दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा हप्ता जमा होतो. महाराष्ट्रातील पात्र शेतकरीही या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.

खात्यात पैसे आले का? मोबाईलवर असे तपासा

तुमचा 24 वा हप्ता जमा झाला आहे की नाही, हे घरबसल्या तपासता येते. सर्वप्रथम पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला(https://pmkisan.gov.in/) वर जा.  होमपेजवरील फार्मर कॉर्नर विभागात जा.   क्लो यूअर स्टेटस या पर्यायावर क्लिक करा.   तुमचा नोंदणी क्रमांक आणि स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा भरा.   नोंदणीकृत मोबाइलवर आलेला ओटीपी टाकून पुढे जा.   स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची पेमेंटची स्टेटस माहिती दिसेल.यामध्ये पैसे कोणत्या बँकेत पाठवले, यूटीआर क्रमांक, खात्यात जमा झाल्याची तारीख आणि पेमेंटची स्थिती पाहता येते.

पैसे जमा झाले नसतील तर काय?

ई-केवायसी अपूर्ण असणे, आधार क्रमांक आणि बँक खात्याच्या तपशिलांमध्ये तफावत असणे किंवा जमीन नोंदींची पडताळणी प्रलंबित असणे, यामुळे हप्ता अडकू शकतो. त्यामुळे क्लो यूअर स्टेटस विभागातील ईकेवायसी, लॅण्ड सिडींग आणि आधार बँक सिडींग या नोंदी तपासा. ई-केवायसी पूर्ण नसेल तर पीएम किसान पोर्टल, मोबाइल अॅप किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून ती पूर्ण करता येते. जमीन नोंदींच्या समस्येसाठी संबंधित तलाठी किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं?

पोर्टलवरील बेनिफिशियरी लिस्ट पर्यायातून तुमचे नाव तपासता येते. त्यासाठी राज्य, जिल्हा, उपजिल्हा, तालुका आणि गाव निवडून यादी पाहता येते. मात्र, यादीत नाव असणे आणि 24 व्या हप्त्याचे पैसे खात्यात जमा होणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे केवळ लाभार्थी यादीवर अवलंबून न राहता पेमेंट स्टेस तपासणे महत्त्वाचे आहे. काही संशयित अपात्र प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण होईपर्यंत लाभ तात्पुरता रोखला जाऊ शकतो, अशी माहिती अधिकृत पोर्टलवर देण्यात आली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES