• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार? ऑक्शनपूर्वी मोठी अपडेट समोर

IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार? ऑक्शनपूर्वी मोठी अपडेट समोर

IPL 2027 Hardik Pandya : आयपीएल 2027 साठी सर्व संघांना पुढील महिन्यात आपल्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. हार्दिक पांड्या हा आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार अशी माहिती समोर येत असतानाच आता यात एक वेगळाच ट्वीस्ट समोर आला आहे.

Reported Bypooja pawar
Published: Oct 30, 2026, 04:03 PM IST|Updated: Oct 30, 2026, 04:13 PM IST
joinshare
IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार? ऑक्शनपूर्वी मोठी अपडेट समोर
Image Credit: IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार?

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
'माझ्या गुप्तांगांमध्ये...', ठाणे पोलिसांवर तरुणांचे गंभीर आरोप; राम पूर्णेकरांनी सांगितला घटनाक्रम

'माझ्या गुप्तांगांमध्ये...', ठाणे पोलिसांवर तरुणांचे गंभीर आरोप; राम पूर्णेकरांनी सांगितला घटनाक्रम

2

न्यूझीलंडला क्लीन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं, भारताचा चौथ्या सामन्यात 87 धावांनी पराभव

3

IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार? ऑक्शनपूर्वी मोठी अपडेट समोर

4

भारतातील 496000000 नागरिक नाही राहिले गरीब; वर्ल्ड बँकेच्या अहवालातून आकडेवारी समोर!

5

'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IPL 2027 Hardik Pandya Mumbai Indians : आयपीएल 2027 च्या पूर्वी हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार अशी शक्यता 19 व्या सीजनच्या मध्यापासूनच सुरु झालेली होती. मागच्या टीम सीजनपासून हार्दिक पांड्या या संघाचं नेतृत्व करत आहे. गुजरात टायटन्समधून पुन्हा मुंबई संघात आल्यावर रोहित शर्माला बाजूला करून हार्दिक पांड्याकडे कर्णधारपदाची सूत्र देण्यात आलेली होती. मात्र त्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सचा संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. यानंतर हार्दिक पांड्या हा आयपीएल 2027 पूर्वी मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार अशी माहिती समोर येत असतानाच आता मीडिया रिपोर्ट्समध्ये समोर येत असलेल्या माहितीनुसार जर मुंबईला ट्रेडमध्ये हार्दिकच्या बदल्यात कोणता योग्य खेळाडू मिळाला नाही तर हार्दिक हा पुढील सीजनसाठी सुद्धा मुंबई इंडियन्समध्येच राहू शकतो. मात्र त्याच्याकडे संघाचं नेतृत्व राहणार की नाही हे पाहणं अधिक महत्वाचं असणार आहे.

हार्दिककडून कर्णधारपद जाणार :

हार्दिक पांड्याच्या ट्रेडबाबत मुंबई इंडियन्सकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रिपोर्ट्सनुसार हार्दिक पांड्या हा दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता आहे. मात्र जर फ्रेंचायझीला योग्य असा ट्रेड प्रस्ताव मिळाला नाही तर ते हार्दिकला कायम ठेऊ शकतात. कदाचित हार्दिककडे संघाचं कर्णधारपद नसू शकतं मात्र तो संघासाठी पूर्ण योगदान देणं सुरु ठेऊ शकतो. त्याच्या भविष्याबाबत निर्णय मुंबई इंडियन्सची मॅनेजमेंट घेईल.

हेही वाचा : मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ

रोहित शर्माला पुन्हा मिळू शकतं नेतृत्व :

मुंबई इंडियन्स आगामी सीजनसाठी कोणत्या खेळाडूची निवड करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. चर्चांनुसार सध्या दोन नावं समोर येत आहेत. पहिलं म्हणजे तिलक वर्मा आणि दुसरं म्हणजे रोहित शर्मा. रोहित शर्माच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत एकूण 5 ट्रॉफी जिंकल्या आहेत तर भविष्याचा विचार करून तिलक वर्माकडे सुद्धा मुंबई इंडियन्स नेतृत्व सोपवू शकते.

कायरन पोलार्डची भूमिका महत्वाची ठरणार :

मुंबई इंडियन्सचा नवा हेड कोच असणाऱ्या कायरन पोलार्डचा संघाच्या कर्णधाराबाबतचा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरेल. त्याने रोहितसोबत अनेक संघाने जिंकलेले अनेक सीजन खेळले आहेत. 2027 च्या आयपीएलनंतर होणारा मेगा ऑक्शन लक्षात घेता, मुंबई इंडियन्सला केवळ आगामी सीजनवर नाही तर भविष्यासाठी संघ उभारण्यावरही लक्ष केंद्रित करावे लागेल.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Mumbai Indians
IPL
Cricket News
Sports News
Hardik Pandya