• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /मनोरंजन
  • /'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

आमने-सामने नाटकाचा वाद आता मराठी कलाकारांपर्यंत पोहोचला आहे. आता यात ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 03:27 PM IST|Updated: Oct 30, 2026, 03:29 PM IST
joinshare
'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'
Image Credit: Aamne Saamne Marathi Natak Controversy

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
न्यूझीलंडला क्लीन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं, भारताचा चौथ्या सामन्यात 87 धावांनी पराभव

न्यूझीलंडला क्लीन स्विप देण्याचं स्वप्न भंगलं, भारताचा चौथ्या सामन्यात 87 धावांनी पराभव

2

IPL 2027 मध्ये ही हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोबतच राहणार? ऑक्शनपूर्वी मोठी अपडेट समोर

3

भारतातील 496000000 नागरिक नाही राहिले गरीब; वर्ल्ड बँकेच्या अहवालातून आकडेवारी समोर!

4

'टाळी एका हाताने वाजत नाही...'; आमने-सामने वादावर प्रशांत दामले स्पष्टचं बोलले, म्हणाले, 'दोघांचेही म्हणणं...'

5

पाकिस्तानने भारताला 4 विकेट्सने केले पराभूत! टीम इंडियाच्या गोलदाजांना धू धू धुतलं...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मराठी रंगभूमीवरील आमने-सामने या नाटकातील कलाकार आणि निर्मात्यांचा वाद विकोपाला गेला आहे. निर्मात्या लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी  रोहन गुजर आणि केतकी विलास यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर दिल्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी या वादावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. वंदना गुप्ते यांनी निर्माते आणि कलाकार यांचे कान टोचले. तर, आता प्रशांत दामले यांनीही उत्तर दिलं आहे.

'प्रत्येक नाट्यनिर्माता आणि त्याच्या नाटकातील कलाकार यांचे संबंध हे सौहार्दाचे असले पाहिजेत. संवादातून प्रश्न सुटू शकतात,' असं प्रशांत दामले यांनी म्हटलं आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, 'टाळी एका हाताने वाजत नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे याबाबतीत दोघांचंही म्हणणं जाणून घ्यायला हवं. नाटकाचा प्रयोग सादर होताना कलाकारांची बांधिलकी ही शेवटी प्रेक्षकांशी असते. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीचा परिणाम प्रयोगावर व्हायला नको याची खबरदारी मात्र घेतली गेली पाहिजे.'

केतकी विलास आणि रोहन गुजर यांना तडकाफडकी नाटकातून काढण्यात आल्यानंतर अनेक कलाकारदेखील व्यक्त झाले आहेत. शशांक केतकर, मयूरी देशमुख, ऋतुजा बागवे यांसारख्या कलाकारांनी रोहन आणि केतकी यांना पाठिंबा दिला आहे. तर, अभिनेत्री वंदना गुप्ते यांनीही स्पष्टपणे मत मांडली आहेत.

वंदना गुप्ते काय म्हणाल्या?

'लीना आणि मंगेश मी तुमचा व्हिडिओ पाहिला. मला खरंच फार वाईट वाटलं, मलाही भरून आलं. पण आपणही कलाकार आहोत आणि आपण या सगळ्यातून गेलेलो आहोत. मलाही आठवतंय... सुरुवातीला मला 80 रुपये मिळायचे, ते शंभर रुपये करा यासाठी मी मोहन काकांना जवळपास 15 वेळा तरी सांगितलं होतं. तेव्हा मग त्यांनी शंभराव्या प्रयोगाला माझं मानधन वाढवलं. हे सगळं ठिक आहे, पण आपण असं करत नाही ना गं, अचानक त्या कलाकारांना थांबवायचं आणि सांगायचं नाही हा तुमचा शेवटचा प्रयोग आहे. असा आपला कोणी अपनान केला तर, आपल्याला सहन होईल का? मंगेशलाही सहन होणार नाही. एक पद्धत असते सांगायची. विचार करुन या गोष्टी करायला हव्या होत्या, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे,'' असं वंदना गुप्ते यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला आहे.

अभिनेता रोहन गुजर आणि अभिनेत्री केतकी विलास यांना मानधनाच्या वादावरुन नाटकातून तडकाफडकी रिप्लेस करण्यात आले होते. दोघांनीही इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत निर्मात्यांवर आरोप केले होते. '18 ऑक्टोबरला रवींद्र नाट्यमंदिरला प्रयोग झाला. त्यानंतर एक मीटिंग घेऊन आम्हाला सांगितलं की हा तुमचा शेवटचा प्रयोग. आम्हाला नीट गुडबायही करता आला नाही, आम्ही आमचा शेवटचा प्रयोग नीट एन्जॉय केला नाही, आम्हाला शेवटचा प्रयोग सेलिब्रेट करता आला नाही' असं दोघांनी म्हटलं होतं.

मात्र रोहन आणि केतकीच्या आरोपांवर नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी दोघांना प्रत्युत्तर देत, तिसऱ्यांदा मागितलेली मानधनवाढ परवडणारी नसल्यामुळे आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला, असं लीना भागवत यांनी स्पष्ट केलं होतां.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Entertainment News
Marathi Batmya
Marathi News