IND vs PAK Match Result : भारत आणि पाकिस्तान हाँगकाँग सिक्सेस 2026 मध्ये आमनेसामने आले या सामन्यामध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या स्पर्धेमध्ये टीम इंडिया कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे, या सामन्यामध्ये पाकिस्तानच्या संघाने भारतला 4 विकेट्सने पराभूत केले. हाँगकाँग सिक्सेस या स्पर्धेमध्ये टीम इंडियाने निराशानजक कामगिरी पाहायला मिळाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा हा फॅारमॅट फार वेगळा आहे, यामध्ये प्रत्येक संघाकडून 11 खेळाडू नाही तर प्रत्येक संघाकडून 7 खेळाडू खेळतात. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची पहिल्या डावामध्ये फलंदाजी केली. या सामन्यात भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत 6 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 88 धावा केल्या. हे लक्ष्य पाकिस्तानच्या संघाने 3.5 ओव्हरमध्ये पूर्ण केले आणि संघाला विजय मिळवून दिला. प्रत्युत्तरात, पाकिस्तानी संघाने भारतीय कर्णधार कृणाल पांड्याला पहिल्याच षटकात धुलाई केली. अब्बासच्या सलग पाच षटकारांमुळे आणि पहिल्याच चेंडूवरील एका धावेमुळे त्या षटकात एकूण 31 धावा झाल्या.
हे ही वाचा
भारतीय संघाच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर राहुल त्रिपाठी 5 चेंडूमध्ये 9 धावा करुन बाद झाला. नितीश राणा देखील फार काही करु शकला नाही त्याने 19 धावा केल्या आणि बाद झाला. टीम इंडियाचा अष्टपैलू शशांक सिंगने याने संघासाठी चांगली कामगिरी केली पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. या सामन्यामध्ये त्याने 11 चेंडूमध्ये 40 धावा केल्या आणि बाद झाला. राहुल तेवतिया आणि कृणाल पांड्या हे दोन्ही खेळाडू पहिल्याच त्यांच्या चेडूवर बाद झाले. भारताची गोलंदाजी देखील फार काही प्रभावी राहिली नाही.
WHAT A FIERY KNOCK BY SHASHANK Catch all the action from Hong Kong Sixes LIVE only on FanCode #HongKongSixes https://t.co/H68f784Od7
— FanCode (@FanCode) October 30, 2026
पाकिस्तानच्या कामगिरीबद्दल सांगायचे झाले तर संघाचे कर्णधारपद हे अब्बास अफ्रिदी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या फलंदाजांची या सामन्यामध्ये प्रभावी कामगिरी पाहायला मिळाली, ख्वाजा नफाय याने संघासाठी 12 चेंडूमध्ये 41 धावा केल्या यामध्ये त्याने 5 षटकार आणि 2 चौकार मारले. अब्बास अफ्रिदीने संघासाठी 8 चेंडूमध्ये 35 धावा केल्या, त्यांच्या दोघांच्या खेळीच्या जोरावर संघाने भारताविरुद्ध पाकिस्तानने सहज लक्ष्य वेधले आहे.