• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ

मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ

Mumbai Indians WPL 2027 Full Squad : WPL 2027 मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं. यासाठी मुंबई फ्रेंचायझीने एकूण 70 लाख रुपये खर्च केले. तेव्हा आगामी सीजनसाठी मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ कसा असणार याविषयी जाणून घेऊयात.

Reported Bypooja pawar
Published: Oct 29, 2026, 06:36 AM IST|Updated: Oct 29, 2026, 07:32 AM IST
joinshare
मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ
Image Credit: मुंबई इंडियन्सने ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड खेळाडूंना खरेदी केलं, पाहा 2027 साठी MI चा संपूर्ण संघ

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

पाकिस्तानातही रामायणची क्रेझ! तिथेही प्रदर्शित होणार चित्रपट? थेट कराचीमध्ये लागले पोस्टर, पहा Video

2

IAS रूबल अग्रवाल यांचा उद्धव ठाकरेंना जबरदस्त धक्का! मुंबईच्या माजी महापौरांचे नगरसेवक पद अखेर रद्द

3

मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्यावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'पूर्णेकर हत्या प्रकरणी त्यांनी...'

4

हार्दिक पांड्याच्या ट्रेडसंदर्भात आर अश्विनचा मोठा दावा! CSK चे 'हे' तीन खेळाडू द्यावे लागणार?

5

50 लाख प्रवासी, 3 कंपन्या अन् 3 नोव्हेंबर 2026 ची डेडलाईन... नवी मुंबई एअरपोर्टसंदर्भात मोठी अपडेट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Mumbai Indians WPL 2027 Full Squad : इंडियन प्रीमियर लीगच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेल्या महिला प्रीमियर लीगच्या आगामी सीजनसाठी मिनी ऑक्शन पार पडलं. या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने त्यांच्याजवळ इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी पर्स असताना सुद्धा 6 खेळाडूंना आपल्या संघात सामील केले. मुंबईने महिला प्रीमियर लीगच्या 2027 ऑक्शनमध्ये 70  लाख रुपये खर्च केले. दोनवेळची WPL 2027 स्पर्धेचा चॅम्पियन ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ ऑक्शनमध्ये एकूण 90 लाख रुपये घेऊन उतरला होता. आक्रमक फलंदाज किरण नवगिरेसाठी मुंबई इंडियन्सने जोरदार बोली लागली होती, परंतु अखेरीस 75 लाख रुपयांची बोली लावून दिल्ली कॅपिटल्सने तिला आपल्या संघात सामील करून घेतले.

मुंबई इंडियन्सने महिला प्रीमियर लीग 2027 च्या ऑक्शनमध्ये 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंना खरेदी केलं. फ्रँचायझींनी या खेळाडूंवर प्रत्येकी 10 लाख रुपये खर्च केले. मुंबईने उत्तर प्रदेश वॉरियर्सच्या (UP Warriorz) माजी टॉप-ऑर्डर फलंदाज श्वेता सेहरावतला 20 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले. श्वेता सेहरावतला खरेदी करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनेही तिच्यासाठी बोली लावली होती, मात्र अखेर मुंबईने बाजी मारली.

मुंबई इंडियन्सने दिशा कासतला 10 लाख रुपयांवर खरेदी केलं. कासत व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्सने सानिका चाळके, भारती रावळ आणि लतिका इनामदार यांना प्रत्येकी 10 लाख रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील केले. यापैकी कोणत्याही खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव नाही.

हेही वाचा  : WPL 2027 : ऑस्ट्रेलियाची कर्णधार मालामाल! कोणता खेळाडू कोणत्या संघात दाखल? वाचा सविस्तर

महिला प्रीमियर लीग 2027 मध्ये मुंबई इंडियन्स त्यांच्या प्लेईंग 11 मध्ये अधिकाधिक पाच परदेशी खेळाडूंना सामील करू शकते. याचे कारण असे की त्यांच्या संघात 'असोसिएट' सदस्य राष्ट्रातील एका खेळाडूचाही समावेश आहे. WPL च्या नियमांनुसार जर एखाद्या संघात असोसिएट सदस्य राष्ट्रातील खेळाडू असेल, तर त्यांना पाच परदेशी खेळाडूंना मैदानात उतरवण्याची परवानगी मिळते. मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी सायका इशाक, पूनम खेमनार, त्रिवेणी वशिष्ठ, नल्ला रेड्डी, मिली इलिंगवर्थ आणि जी. कमलिनी यांना सीरिज केलं होतं.

कशी वाटते आपली squad for TATAWPL 2027?  https://t.co/H5NnnTXkNc

Mumbai Indians (mipaltan) October 28, 2026

मुंबई इंडियन्सने ऑक्शनपूर्वी रिटेन केलेले खेळाडू :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, वैष्णवी शर्मा, राहिला फिरदौस, नट सिवर ब्रंट, अमेलिया केर, हेली मैथ्यूज, निकोला कॅरी, शबनीम इस्माइल, तारा नॉरिस,

मुंबई इंडियन्सने आयपीएल 2027 ऑक्शनमध्ये घेतले 6 खेळाडू :

श्वेता सेहरावत- 20 लाख रुपये

दिशा कासट- 10 लाख रुपये

लतिका इनामदार- 10 लाख रुपये

सनिका चालके- 10 लाख रुपये

अक्षिता भगत-10 लाख रुपये

भारती रावल- 10 लाख रुपये

आयपीएल 2027 साठी मुंबई इंडियन्सचा संघ :

हरमनप्रीत कौर (कर्णधार), श्वेता सहरावत, दिशा कासट, सानिका चालके, राहिला फिरदौस, लतिका इनामदार, नट सिवर ब्रंट, अमेलिया केर, हेली मॅथ्यूज, निकोला कॅरी, अमनजोत कौर, सजीवन सजना, संस्कृति गुप्ता, अक्षिता भगत, शबनीम इस्माइल, तारा नॉरिस, वैष्णवी शर्मा, भारती रावल

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Marathi News
Cricket News
Harmanpreet Kaur
Sports News