महिला प्रिमियर लीग 2027 चा लिलाव आज पार पडला, या झालेल्या मिनी लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर बोली फ्रन्चायझींनी लावली होती. या लिलावामध्ये 150 खेळाडू सहभागी झाली आहेत, यामध्ये 27 जागा उपलब्ध होत्या. पण यामध्ये केवळ 25 खेळाडूंची खरेदी करण्यात आली आहे, यूपी वॉरियर्स, मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांनी प्रत्येकी 18 खेळाडूंसह आपले संघ पूर्ण केले. या मिनी लिलावामध्ये खेळाडूवर फ्रन्चायझींनी बोली लावली, यामध्ये ऑस्ट्रेलियाची सोफी मोलिन्यू ही लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली, तिला यूपी वॉरियर्सने 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले. दरम्यान, लिलावातील दुसरी सर्वात महागडी खेळाडू, किरण नवगिरे हिला दिल्ली कॅपिटल्सने 75 लाख रुपयांना खरेदी केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या संघाने 2024 मध्ये विजेतेपद जिंकले होते, या संघाचा सोफी मोलिन्यू भाग होती. पण यावेळी आरसीबीच्या संघाने या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूला रिटेन केले नाही. सोफी मोलिन्यूने यापूर्वी महिला प्रीमियर लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्या हंगामात, तिने आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना त्रस्त करत 10 सामन्यांमध्ये 12 बळी घेतले होते. तिच्या कामगिरीने संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. मात्र, दुखापतीमुळे मोलिन्यूक्सला गेल्या हंगामातील डब्ल्यूपीएल खेळता आले नाही. कमरेच्या दुखापतीमुळे ती क्रिकेटपासून दूर राहिली. आता, एका नवीन संघासोबत, पुन्हा एकदा आपली छाप पाडण्याचे तिचे ध्येय आहे.
हे ही वाचा
सोफी मोलिन्यू – यूपी वॉरियर्सने 1.1 कोटी रुपयांना खरेदी केले
किरण नवगिरे – दिल्ली कॅपिटल्सने 75 लाख रुपयांना खरेदी केले
जी. कमलिनी – गुजरात जायंट्सने 40 लाख रुपयांना खरेदी केले
जेस जोनासेन – रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने 40 लाख रुपयांना खरेदी केले
भारतीय पॉवर-हिटर किरण नवगिरेनेही लिलाव हॉलमध्ये बरीच चर्चा निर्माण केली. 40 लाख रुपयांच्या मूळ किमतीपासून सुरू झालेल्या या लढतीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने होते. किंमत 70 लाख रुपयांच्या पुढे गेल्यावर, मर्यादित पर्समुळे (90 लाख रुपये) मुंबई इंडियन्सने माघार घेतली आणि दिल्ली कॅपिटल्सने किरण नवगिरेला 75 लाख रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले.