• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /भारताच्या हवामानात महाभयानक बदल, महाराष्ट्रासह 18 राज्यांना IMD चा अलर्ट; चक्रीवादळाचे थैमान, शाळांना सुट्टी

भारताच्या हवामानात महाभयानक बदल, महाराष्ट्रासह 18 राज्यांना IMD चा अलर्ट; चक्रीवादळाचे थैमान, शाळांना सुट्टी

Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 29 ऑक्टोबर 2026 उद्याचे हवामान ): अर्णब चक्रीवादळामुळे थैमान घातले आहे. किनारपट्टीवरील राज्यांना याचा तडाखा बसला आहे. या वादळामुळे महाराष्ट्रात देखील अलर्ट देण्यात आला आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Oct 28, 2026, 10:22 PM IST|Updated: Oct 28, 2026, 10:25 PM IST
joinshare
भारताच्या हवामानात महाभयानक बदल, महाराष्ट्रासह 18 राज्यांना IMD चा अलर्ट; चक्रीवादळाचे थैमान, शाळांना सुट्टी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महाराष्ट्रात काँग्रेसचा भारतातील एकमेव विजय; नागपूरमध्ये अभिजित वंजारी यांनी बाजी मारली, भाजपला धक्का

महाराष्ट्रात काँग्रेसचा भारतातील एकमेव विजय; नागपूरमध्ये अभिजित वंजारी यांनी बाजी मारली, भाजपला धक्का

2

'रावण हा पूर्णपणे दुष्ट नाही...' अभिनेत्री साई पल्लवीच्या वक्तव्यामुळे नवा वाद! पहा Video

3

भारताच्या हवामानात महाभयानक बदल, महाराष्ट्रासह 18 राज्यांना IMD चा अलर्ट; चक्रीवादळाचे थैमान, शाळांना सुट्टी

4

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी: सुप्रीम कोर्टात ठाकरे आणि शिंदेंच्या वकिलांचं एकमत, सिब्बलांच्या मुद्द्यावर म्हणाले, 'आम्हालाही...'

5

कर्जतमधील टोरंट प्रकल्पावरुन राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना विचारले 10 प्रश्न; केला मोठा दावा, 'डिसेंबरमध्ये सरकार...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

29 ऑक्टोबर 2026 उद्याचे हवामान : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले अर्णब चक्रीवादळ अखेर किनार पट्टीवर धडकले आहे.  चेन्नई, ओडिशा, आंध्र प्रदेशला अर्णब चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी वादळी वा-यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खरबदारी म्हणून छत्तीसगडमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे भारताच्या हवामानात भयानक बदल झाला आहे.  महाराष्ट्रासह 18 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. ताशी 95 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. वादळामुळे अनेक राज्यांमध्ये सतर्क राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

समुद्रात उंच लाटा उसळल्या

वादळामुळे समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या सतर्केचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. हवामान विभागाने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे समुद्र खवळणार आहे. समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. गुरुवारपर्यंत मासेमारीवर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर, समुद्रात आधीच असलेल्या मच्छिमारांना परत येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डोंगराळ भागात भूस्खलनाचा धोका आहे.

महाराष्ट्रासह 18 राज्यांना हवामान खात्याचा अलर्ट

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, गुजरात,  उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, झारखंड,  आसाम, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम या 18 राज्यांना हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही भागांवर परिणाम

‘अर्णब’ चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील काही भागांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड मंडळाशी संबंधित चार रेल्वे सेवां रद्द केल्या आहेत. विदर्भातआज मेघगर्जना, वीज पडणे आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राला चक्रीवादळाचा थेट तडाखा बसण्याचा अंदाज नाही. मात्र, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये सतर्कता आवश्यक आहे. रेल्वे प्रवाशांनी प्रवासापूर्वी गाड्यांची स्थिती तपासावी. नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Weather
Weather News
Maharashtra News