Nagpur MLC Election Result 2026: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अभिजित वंजारी यांनी बाजी मारली मारली आहे. अभिजित वंजारी यांनी भाजपला धक्का दिला आहे. महाराष्ट्रात काँग्रेसचा भारतातील एकमेव उमेदवार विजयी झाले आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये काँग्रसचा हा पहिला विजय आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्र या चार राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. याचे निकाल जाहीर झाले आहेत. पहिल्यांदाच बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकांच्या निकालात देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेससाठी मोठा धक्का बसला आहे. कर्नाटकमध्ये, जिथे काँग्रेसची सत्ता आहे, तिथे काँग्रेसला विधान परिषद निवडणुकीत पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. विरोधी भाजप-जेडीएस आघाडीने चारही जागांवर निर्विवाद विजय मिळवला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्येही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात मात्र, काँग्रेसचे अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे.
पदवीधर निवडणुकीत महायुतीचा सुपडासाफ झाला आहे. नागपूर, संभाजीनगर, पुण्यात मविआचा विजय झाला आहे. नागपूरमध्ये काँग्रेसच्या अभिजीत वंजारींनी विजयाचा गुलाल उधळला आहे. अटीतटीच्या सामन्यात वंजारी यांनी भाजप उमेदवार सुधाकर कोहळेंचा दारूण पराभव केला.
गेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी यंदा भाजपने संघटनात्मक ताकद पदवीधर निवडणुकीत झोकून दिली होती. खुद्द मुख्यमंत्री निवडणूक प्रचार आणि बंडखोरी शमवण्यात सक्रीय होते. मुख्यमंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. फडणवीसांपासून ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांसह भाजपा नेत्यांचा आणि मंत्र्यांचा फौज फाटा पदवीधर मध्ये सुधाकर कोहळेंच्या प्रचारात दिसून आला. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्याच खांद्यावर घेतली होती. काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार केला.
नागपूर पदवीधर निवडणुकीचा विजयाचा निर्णय निश्चित होण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते अभिजीत वंजारी यांच्या विजयाचा जल्लोष सुरू केला. मतमोजणी केंद्रासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपविरोधी घोषणा दिल्याने भाजप कार्यकर्त्यांकडूनही काँग्रेस विरोधात घोषणाबाजी केल्याने वातावरण तापलं. पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत केलं