Diwali Gift : दिवाळी जवळ आली सर्वच ऑफिसमध्ये एकच चर्चा असते ती म्हणजे दिवाळी गिफ्ट काय मिळाले. अनके कंपन्या दिवाळी फिफ्ट म्हणून कर्मचाऱ्यांना मिठाई, चॉकलेट किंवा ड्राय फ्रूट देतात. तर, काही कंपन्या शोभेच्या वस्तू, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू गिफ्ट म्हणून देतात. मात्र, भारतातील एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना Kia sonet कार दिवाळी गिफ्ट म्हणून दिली आहे. Kia sonet कार कर्मचाऱ्यांना गिफ्ट म्हणून दिली. कर्मचाऱ्यांना कार शो रुममध्ये जाऊन आपले दिवाळी गिफ्ट घ्यावे लागले.
सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हरियाणातील एका कंपनीने दिवाळीपूर्वी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किया सोनेट कार भेट देऊन आश्चर्यचकित केले. एमआयटीएस हेल्थकेअर असे या कंपनीचे नाव आहे. कंपनीच्या चार मेहनती कर्मचाऱ्यांना हे दिवाळी गिफ्ट देण्यात आले आहे.
मिट्स हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आपल्या mitshealthcarepvtltd सोशल मिडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. फोटो आणि व्हिडिओ व्हायरल जाले आहेत.
एका शो रुममध्ये कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट देण्यात आले. कंपनीचे CEO आणि संस्थापक अध्यक्ष एम. के. भाटिया यांनी कर्मचाऱ्यांना कारच्या चाव्या दिल्या. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार नितीन, निर्मल, व्हीनस आणि गुरवीर या चार कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट म्हणून देण्यात आली आहे.
दिवाळी गिफ्ट देताना कारच्या शो रुममध्ये कंपनीचा मालक देखील उपस्थित होता. यावेळी केक कापून याचे जंगी सेलिब्रेशन देखील करण्यात आले. हे तुमच्या मेहनतीचं फळं आहे असं म्हणत मालकाने कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आणि त्यांच्या हातात Kia sonet कारच्या चाव्या दिल्या.
कर्मचाऱ्यांना Kia sonet कार गिफ्ट म्हणून देणाऱ्या या बॉसचे सर्वत्र कौतुक होत आहे. ही कंपनी कुठे आहे? या कंपनीत जॉबसाठी अप्लाय कसा करायचं? असे प्रश्न कमेंटमध्ये विचारले आहेत. असा बॉस आम्हाला पण मिळू दे अशी कमेंट काही जणांनी केली आहे.