SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

3008 चॅट्स, 42 कॉल, तसे फोटो अन् क्षणात सीक्रेट ड्रोन यूनिटचा डेटा! हनीट्रॅपमध्ये असा अडकला वायुसेनेचा अधिकारी, धक्कादायक माहिती समोर

भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर हनीट्रॅप प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 16, 2026, 01:20 PM IST | Updated: Nov 16, 2026, 01:28 PM IST
Image Credit: indian Air Force officer honey trapped
Join

दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपपत्रातून खुलासा झाला आहे की, भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरवर 3008 चॅट्स आणि 42 व्हॉईस कॉल्सद्वारे एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत गोपनीय माहिती शेअर करण्यात आली आहे. या गोपनीय माहितीमध्ये युद्ध नियोजनाच्या दस्तऐवजांपासून ते लढाऊ विमानांच्या तैनाती आणि हालचालींच्या माहिती या विंग कमांडरने शेअर केली आहे. हे सगळं प्रकरण हनीट्रॅपचं आहे. या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी सुरु होत्या. याच फायदा घेत पाकिस्तानमधील हे गुप्तहेर महिलेने त्यांच्याकडून सर्व भारताबद्दलची गुप्त माहिती काढून घेतली.

हनीट्रॅप प्रकरणात मोठा खुलासा

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगण्यात आलंय की, विंग कमांडर जानेवारी ते एप्रिल दरम्यान एका संशयित पाकिस्तानी ऑपरेटिवच्या संपर्कात होते. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, ते दोघे व्हॉट्सॲपवर वारंवार बोलत होते. ज्या दरम्यान 65 फोटो आणि 65 रिएक्शन एकमेकांना पाठवलं आहे. आरोपपत्रातील दाव्यानुसार जेव्हा त्याला एक न्यूड फोटो मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्याने एका गोपनीय युद्ध प्लॅनिंगच्या डाक्युमेंटचे फोटो अपलोड करुन तिला पाठवले. धक्कादायक म्हणजे प्रत्येक न्यूड फोटोसाठी या अधिकाऱ्याने बदल्यात युद्ध प्लनिंगचे एक पान देण्याचे वचन दिलं.

दरम्यान या अधिकाऱ्याला पाच महिन्यांपूर्वीच अटक झाली आहे. त्या पोलिसांनी आरोपपत्र दिल्ली कोर्टात सादर केलं आहे. ज्यातून हे धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अधिकाऱ्याला शासकीय गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपपत्रात सांगितलं की, लीक झालेल्या माहितीमुळे भारतातील लष्करी तळ आणि कारवायांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

धक्कादायक म्हणजे त्या अधिकाऱ्याने एका गुप्त ड्रोन युनिटची संख्या आणि संघटनात्मक रचनेविषयी या पाकिस्तानी महिलेला माहिती दिली आहे. यामध्ये ड्रोन चाचणी आणि त्यांच्या कार्यक्षमतेच्या तपशिलांचा समावेश केला आहे. पोलिसांचा दावा आहे की, ड्रोनचे कार्यकाळ आणि लक्ष्यीकरण पद्धती यांसारखी संवेदनशील माहितीदेखील पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्यामुळे खळबळ माजली आहे. युद्धाच्या परिस्थितीत ड्रोन तैनात करण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची माहितीदेखील या अधिकाऱ्याने त्या महिलेला दिली आहे. या अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे भारतीय सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.

अधिकाऱ्यावर सर्वात गंभीर आरोप

या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे संशयित पाकिस्तानी गुप्तहेर महिला त्या अधिकाऱ्याला काही मालवेअर आणि स्पायवेअर ॲप्लिकेशन्स पाठवले होते, हे तपासातून समोर आले आहे. पोलिसांच्या मते, या ॲप्लिकेशन्सद्वारे अधिकाऱ्याच्या उपकरणांवर साठवलेला संवेदनशील डेटा आणि वरिष्ठांसोबतचा त्याचा संवाद मिळवणे सोपे होतं. तसंच विंग कमांडरने आपल्या युनिटमधील पाच कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयसीटी उपकरणांवरही विशिष्ट मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचे तपासातून उघड झालं आहे.

आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर

आरोपपत्रात व्हॉट्सॲप डेटामधून असं समोर आलंय की, अधिकारी आणि संशयित पाकिस्तानी तरुणीमध्ये एकूण 3008 मेसेजेस झाले होते. त्यासोबत 65 फोटो शेअर आणि 65 प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. दोघांमध्ये 42 व्हॉइस कॉल्स आणि चार व्हिडीओ कॉल्स देखील झाल्याचे समोर आलं आहे. या मेसेजेसमध्ये सहा यूआरएल (URLs) शेअर केले गेले होते. हे सगळं 12 जानेवारी ते 1 एप्रिलदरम्यान झाला आहे.  दरम्यान आरोपपत्रात नमूद केलेल्या आरोपांसंदर्भातील कायदेशीर कार्यवाही न्यायालयात करण्यात येत आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES