दिल्ली पोलिसांच्या आरोपपत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपपत्रातून खुलासा झाला आहे की, भारतीय हवाई दलाच्या एका विंग कमांडरवर 3008 चॅट्स आणि 42 व्हॉईस कॉल्सद्वारे एका पाकिस्तानी गुप्तचर एजंटसोबत गोपनीय माहिती शेअर करण्यात आली आहे. या गोपनीय माहितीमध्ये युद्ध नियोजनाच्या दस्तऐवजांपासून ते लढाऊ विमानांच्या तैनाती आणि हालचालींच्या माहिती या विंग कमांडरने शेअर केली आहे. हे सगळं प्रकरण हनीट्रॅपचं आहे. या अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी सुरु होत्या. याच फायदा घेत पाकिस्तानमधील हे गुप्तहेर महिलेने त्यांच्याकडून सर्व भारताबद्दलची गुप्त माहिती काढून घेतली.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, दिल्ली न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात सांगण्यात आलंय की, विंग कमांडर जानेवारी ते एप्रिल दरम्यान एका संशयित पाकिस्तानी ऑपरेटिवच्या संपर्कात होते. पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, ते दोघे व्हॉट्सॲपवर वारंवार बोलत होते. ज्या दरम्यान 65 फोटो आणि 65 रिएक्शन एकमेकांना पाठवलं आहे. आरोपपत्रातील दाव्यानुसार जेव्हा त्याला एक न्यूड फोटो मिळाल्यानंतर त्या अधिकाऱ्याने एका गोपनीय युद्ध प्लॅनिंगच्या डाक्युमेंटचे फोटो अपलोड करुन तिला पाठवले. धक्कादायक म्हणजे प्रत्येक न्यूड फोटोसाठी या अधिकाऱ्याने बदल्यात युद्ध प्लनिंगचे एक पान देण्याचे वचन दिलं.
दरम्यान या अधिकाऱ्याला पाच महिन्यांपूर्वीच अटक झाली आहे. त्या पोलिसांनी आरोपपत्र दिल्ली कोर्टात सादर केलं आहे. ज्यातून हे धक्कादायक खुलासे झाले आहेत. या अधिकाऱ्याला शासकीय गुप्तता कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपपत्रात सांगितलं की, लीक झालेल्या माहितीमुळे भारतातील लष्करी तळ आणि कारवायांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
धक्कादायक म्हणजे त्या अधिकाऱ्याने एका गुप्त ड्रोन युनिटची संख्या आणि संघटनात्मक रचनेविषयी या पाकिस्तानी महिलेला माहिती दिली आहे. यामध्ये ड्रोन चाचणी आणि त्यांच्या कार्यक्षमतेच्या तपशिलांचा समावेश केला आहे. पोलिसांचा दावा आहे की, ड्रोनचे कार्यकाळ आणि लक्ष्यीकरण पद्धती यांसारखी संवेदनशील माहितीदेखील पाकिस्तानी गुप्तहेरांना दिल्यामुळे खळबळ माजली आहे. युद्धाच्या परिस्थितीत ड्रोन तैनात करण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची माहितीदेखील या अधिकाऱ्याने त्या महिलेला दिली आहे. या अधिकाऱ्यांच्या या कृत्यामुळे भारतीय सुरक्षेचा धोका निर्माण झाला आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर आरोप म्हणजे संशयित पाकिस्तानी गुप्तहेर महिला त्या अधिकाऱ्याला काही मालवेअर आणि स्पायवेअर ॲप्लिकेशन्स पाठवले होते, हे तपासातून समोर आले आहे. पोलिसांच्या मते, या ॲप्लिकेशन्सद्वारे अधिकाऱ्याच्या उपकरणांवर साठवलेला संवेदनशील डेटा आणि वरिष्ठांसोबतचा त्याचा संवाद मिळवणे सोपे होतं. तसंच विंग कमांडरने आपल्या युनिटमधील पाच कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या आयसीटी उपकरणांवरही विशिष्ट मालवेअर किंवा स्पायवेअर इन्स्टॉल केल्याचे तपासातून उघड झालं आहे.
आरोपपत्रात व्हॉट्सॲप डेटामधून असं समोर आलंय की, अधिकारी आणि संशयित पाकिस्तानी तरुणीमध्ये एकूण 3008 मेसेजेस झाले होते. त्यासोबत 65 फोटो शेअर आणि 65 प्रतिक्रिया नोंदवण्यात आल्या. दोघांमध्ये 42 व्हॉइस कॉल्स आणि चार व्हिडीओ कॉल्स देखील झाल्याचे समोर आलं आहे. या मेसेजेसमध्ये सहा यूआरएल (URLs) शेअर केले गेले होते. हे सगळं 12 जानेवारी ते 1 एप्रिलदरम्यान झाला आहे. दरम्यान आरोपपत्रात नमूद केलेल्या आरोपांसंदर्भातील कायदेशीर कार्यवाही न्यायालयात करण्यात येत आहे.