वयस्कर आई-वडिलांसोबत राहण्यासाठी मायक्रोसॉफ्टची गलगठ्ठ पगाराची नोकरी सोडली! 23 वर्षानी दिला राजीनामा, नेटकरी भारावले
मायक्रोसॉफ्ट सोडत असल्याचं जाहीर केल्यानंतर LinkedIn वर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे.
भारतात राहणाऱ्या आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत अधिक वेळ घालवता यावा यासाठी एका व्यक्तीने निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयावर अनेक नेटकरी व्यक्त झाले असून, आनंद व्यक्त केला आहे. LinkedIn वरील त्यांच्या पोस्टवर अनेकजण व्यक्त झाले आहेत. करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले आहे. आई-वडिलांसोबत अधिक वेळ घालवणे हाच योग्य निर्णय असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
मायक्रोसॉफ्टमध्ये 'व्हाइस प्रेसिडेंट ऑफ इंजिनिअरिंग' (Vice President of Engineering) म्हणून 23 वर्षं काम केल्यानंतर, केशवन षण्मुगम यांनी भारतातील आपल्या वृद्ध आई-वडिलांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांनी LinkedIn पोस्टद्वारे हा निर्णय जाहीर केला आणि सांगितले की त्यांना आता कुटुंब आणि मित्रांवर अधिक लक्ष केंद्रित करायचे आहे.
षण्मुगम यांनी सांगितले की, मायक्रोसॉफ्ट सोडण्याचा निर्णय घेणे कठीण होते कारण त्यांना 'एक्सेल को-पायलट' (Excel Copilot) वरील काम आणि सहकाऱ्यांसोबत काम करणे खूप आवडत होते. तरीही, आई-वडिलांसोबत अधिक वेळ घालवणे हाच योग्य निर्णय असल्याचे त्यांना वाटले.
त्यांनी लिहिले, "असा निर्णय घेणे शक्य करून दिल्याबद्दल मी मायक्रोसॉफ्टचा अत्यंत ऋणी आहे. तसेच, मायक्रोसॉफ्टमधील माझा प्रवास आनंददायी, रोमांचक आणि समाधानकारक बनवणाऱ्या - मग ते जुने असोत वा सध्याचे - त्या सर्व सहकाऱ्यांचेही मी मनापासून आभार मानतो."
सोशल मीडियावरील प्रतिक्रिया
त्यांच्या या निर्णयावर LinkedIn वर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. करिअरपेक्षा कुटुंबाला प्राधान्य देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक केले. एका युजरने कमेंट केली, "हा कदाचित तुम्ही घेतलेल्या सर्वोत्तम निर्णयांपैकी एक आहे."
दुसऱ्या एका युजरने म्हटले, "बंधू, मी तुम्हाला वैयक्तिकरित्या ओळखत नाही, पण पालकांना प्राधान्य देण्याच्या तुमच्या निर्णयाने माझे लक्ष वेधून घेतले आणि तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत." तिसऱ्या युजरने पुढे म्हटले, "ज्या कामाचा तुम्ही अजूनही आनंद घेता, ते काम सोडणे सोपे नसते; परंतु पालकांसोबत अधिक वेळ घालवणे हे आयुष्यातील एक नवीन पर्व सुरू करण्यासाठीचे एक अर्थपूर्ण कारण आहे."
चौथ्या युजरने कमेंट केली, "तुम्हाला कदाचित आत्ता याची जाणीव होणार नाही, पण तुम्ही आयुष्यात केलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी ही एक गोष्ट ठरेल."