• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /भारतातलं सगळ्यात छोटं गाव... इथं किती लोक राहतात? ते काय काम करतात? हे गाव आहे तरी कुठं?

भारतातलं सगळ्यात छोटं गाव... इथं किती लोक राहतात? ते काय काम करतात? हे गाव आहे तरी कुठं?

तुम्ही देशातील सर्वात छोट्या आणि कमी लोकसंख्येच्या गावाबद्दल कधी ऐकलं आहे का? या गावामध्ये कोण राहतं? हे गाव आहे कुठं? इथं राहणारे लोक काय काम करतात? जाणून घ्या सविस्तर माहिती...

Reported BySwapnil Ghangale
Published: Sep 30, 2026, 02:07 PM IST|Updated: Sep 30, 2026, 02:26 PM IST
joinshare
भारतातलं सगळ्यात छोटं गाव... इथं किती लोक राहतात? ते काय काम करतात? हे गाव आहे तरी कुठं?
Image Credit: हे गाव देशातील सर्वात अनोख्या गावांपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

About the Author

Swapnil Ghangale

Swapnil Ghangale

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारतात वेगवेगळी वैशिष्ट्यं असलेली अनेक गावं आहेत. शनिशिंगणापूरसारखं गाव घरांना दारं नसल्याने प्रसिद्ध आहे. तर कोकणातली अनेक गावं ही निसर्गरम्य परिसर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील वेगवगेळ्या भागांमधील वेगवेगळी गावं अनोख्या कारणांसाठी प्रसिद्ध आहेत.  आज आपण अशाच एका अनोख्या गावाबद्दल जाणून घेणार आहोत तिथे केवळ एकच घर असून या एका घरातून गावचा संपूर्ण कारभार चालतो. हे गाव येथील लोकसंख्येमुळेही अनोख्या गावांच्या यादीत आहे. हे गाव नेमकं आहे कुठे तिथं कोण राहतं आणि काय आहे त्याची गोष्ट जाणून घेऊयात...

गावात 300 वर्षांपूर्वीच एकच घर

संपूर्ण गावाचा कारभार हा एकाच घरातून चालतोय असं सांगितलं तर तुम्ही म्हणाल असं कसं? तर यामागील कारण आहे या गावात एकच घर आहे. य घरामध्ये सहाजण राहतात. हे गाव आपल्या अत्यंत कमी लोकसंख्येमुळे चर्चेत असतं. या गावात माती व दगडांपासून बनवलेलं एकच घर असून याच घरात संपूर्ण गाव म्हणजे इथले सहाजण राहतात. हे एकमेव घर 300 वर्षांहून अधिक जुनं आहे. हे घर केवळ दगड आणि मातीपासून बनवण्यात आलेलं आहे. याच जुन्या घरात सध्या एकाच कुटुंबातील पाचवी पिढी वास्तव्यास आहे.

या गावाचं नाव काय? हे गाव आहे कुठे?

आपण ज्या गावाबद्दल बोलतोय ते गाव हिमाचल प्रदेशमध्ये आहे. येथील निसर्गरम्य स्पीति खोऱ्यात उंचावर वसलेले आहे. या गावाचं नाव 'काकती' असं आहे. स्पीतिमधील काजा येथून हे गाव 10 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरात वसलेलं आहे.

इथं राहाणारे लोक नेमकं करतात काय?

काकाती गावात राहणाऱ्या या एकमेव कुटुंबातील मोठा भाऊ हा पत्नी आणि मुलांसोबत येथे राहून शेती करतात. कुटुंबातील परंपरेनुसार लहान भाऊ कलझंग टाकपा लामा बनले असून ते काझा येथील बौद्ध गोम्पा (मठ) मध्ये सेवा देतात. या गावामध्येच काय तर गावाच्या आजूबाजूला अनेक किलोमीटरपर्यंत लोकवस्ती नाही. शेती आणि त्यातही प्रामुख्याने बटाटे हे इथलं मुख्य पिक असून पशुपालन हा जोडधंदा आहे. अलीकडेच येथे फोर-जी नेटवर्क पोहोचले आहे. या गावाची सरकारी कागदपत्रांमध्ये नोंद असून ते 'एक कुटुंबाचे गाव' म्हणून ओळखलं जातं.

याच नावाच्या गावाशी मराठ्यांशीही संबंध

विशेष म्हणजेच याच काकाती नावाने अजून एक छोटसं गाव भारतात असून ते महाराष्ट्र-कर्नाटक सीमेलगतच्या बेळगावमध्ये आहे. बेळगाव शहरापासून सुमारे 8 ते 10 किलोमीटर अंतरावर काकाती गाव आहे. येथे काकती किल्ला आहे. या गावाला ऐतिहासिक महत्त्व असून इथं कित्तूरची राणी चेन्नम्मा यांचा जन्म झाला होतं. 23 ऑक्टोबर 1778 रोजी चेन्नम्मा यांचा काकातीमध्ये जन्म झालेला. या गावाचा संबंध मराठा साम्राज्याशी आहे. या किल्ल्यावर पेशव्यांचं नियंत्रण होतं अशा नोंदी सापडतात.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india