SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

फ्रान्सहून परतलेल्या मुख्यमंत्री भगवंत मान यांना दिल्ली विमानतळावर 3 तास थांबवलं, ठोठावण्यात आला 50 हजारांचा दंड, काय आहे नेमकं प्रकरण?

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान पॅरिसहून परतल्यानंतर दिल्ली विमानतळावर 3 तास ताब्यात घेतलं होतं, असा दावा आम आदमी पक्षाने केला आहे. त्यानंतर त्यांच्याकडून 50 हजारांचा दंड घेण्यात आला.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 21, 2026, 03:54 PM IST | Updated: Oct 21, 2026, 03:57 PM IST
Image Credit: bhagwant mann
Join

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे सध्या चर्चेत आहेत. आम आदमी पार्टीच्या दाव्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आम आदमी पार्टीने दावा केला आहे की, मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या फ्रान्स दौरा संपल्यानंतर ते दिल्ली विमानतळावर परतल्यानंतर त्यांना तीन तास ताब्यात ठेवण्यात आले. एवढंच नाहीतर त्यांना 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला. या घटनेनंतर  'आप'चे नेते सौरभ भारद्वाज आणि बलतेज पन्नू  यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले आहेत.


केंद्राचा अहंकार आता...

सौरभ भारद्वाज यांनी या घटनेबद्दल 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय की, मुख्यमंत्री मान यांना विमानतळावर जवळपास तीन तास ताब्यात घेण्यात आलं होतं. पंजाबचे मुख्यमंत्री आपल्या राज्याची उत्पादने सादर करण्यासाठी पॅरिसला गेले होते. केंद्र सरकारने NOC देण्यास नकार देऊनही त्यांनी हे केलं आहे. याप्रकरणात केंद्र सरकारचा हा अहंकार आता संपला पाहिजे.

 

 

मुख्यमंत्री मान यांना दिल्ली विमानतळावर का थांबवलं?

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंजाबचे मुख्यमंत्री मान आणि त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांवर 50 हजारांचे सीमा शुल्क आकारण्यात आलंय. दिल्ली विमानतळावर मान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सामानाची तपासणी केली गेली. या तपासणीत असं आढळून आलं की, त्यांनी काही वस्तू घोषित न केल्यामुळे त्यांच्याकडून शुल्क घेण्यात आलं.

 

 

काय आहे परदेशातून आणलेल्या वस्तूंचं विमानतळावरील नियम?

परदेशातून देशात परतल्यावर विमानतळावर काही नियम आहे. या नियमानुसार परदेशातून वस्तू खरेदी केली असेल आणि नसेल अशा प्रवाशांसाठी दोन वेगवेगळे बाहेर जाण्याचे मार्ग असतात. जर तुम्ही परदेशातून कुठल्याही सामानाची खरेदी केली नसेल तर तुम्ही विमानतळावरून हिरव्या गेटमधून बाहेर पडू शकता. पण जर तुम्ही परदेशातून वस्तू खरेदी करुन आले असाल तर तुम्हाला लाल गेटवरून बाहेर पडावं लागतं. शिवाय परदेशातून आणलेल्या वस्तूची घोषित करणेही बंधनकारक असतं. जर तुम्ही त्या वस्तूंची घोषणा केली नसेल तर त्याला शुल्क भरावा लागतो. या नियमानुसार भगवंत मान आणि त्यांचे कर्मचारी यांनी परदेशातून सामन आणलं होतं. शिवाय ते विमानतळावरून ग्रीन गेटवरून बाहेर पडत होते. म्हणून त्यांच्यावर ही कारवाई झालं असं सांगण्यात येत आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES