SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नातवाचा मृत्यू, पुजाऱ्यानेच काळी-जादू केल्याचा संशय, रागाच्या भरात शेजाऱ्यानेच केला भयंकर प्रकार, दोन मुलांसोबत...

बिहारमध्ये एका 70 वर्षीय पुजाऱ्याच्या हत्येप्रकरणात एक धक्कादायक खुलासा करण्यात आला असून शेजाऱ्यांनीच खून केल्याचे समोर आले आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 07, 2026, 10:39 AM IST | Updated: Nov 07, 2026, 10:40 AM IST
Image Credit: temple priest hiralal mandal ended life neighbour superstition grandson
Join

बिहारमध्ये 70 वर्षांच्या पुजाऱ्याच्या हत्येबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. सुरुवातीला जमीन किंवा संपत्तीच्या वादातून पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र आता यामागे जमीन किंवा पैशाचा व्यवहार नसून अंधविश्वास आहे. पुजाऱ्याच्या घराशेजारीच राहणारे अनंतलाल मंडल यांच्या एका संशयातून हत्या करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अनंतलाल मंडल याला संशय होता की पुजारी तंत्र-मंत्र करतो. त्याच तंत्र-मंत्रातून त्याने त्याच्या सहा महिन्याच्या नातवाचा जीव घेतला. याच संशयातून त्याने त्याच्या दोन्ही मुलांसोबत पुजाऱ्याच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी अनंतलालचा अटक केले असून त्याच्या दोन मुलांचा तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींने पुजारीची हत्या केल्यानंतर गावातील स्मशानात त्याचा मृतदेह झाडाला लटकवला होता. ही घटना बिहार राज्यातील कटिहार जिल्ह्यातील आहे. तेथे 70 वर्षीय हिरालाल मंडल गावातील जवळच असलेल्या मंदिरात रोज पूजा-अर्चा करण्यासाठी जातात. ते भजन-किर्तनदेखील करत असत. 1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी ते मंदिरातून निघाले पण घरी पोहोचलेच नाही.

कुटुंबातील लोकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र 2 नोव्हेंबर रोजी गावाच्या बाहेर असलेल्या स्मशानात त्याचा मृतदेह झाडाला लटकवलेल्या अवस्थेत सापडला. ही माहिती मिळताच गावातील लोकांची गर्दी जमा झाली होती. मृतदेहाची अवस्था पाहून कुटुंबातील लोकांनी हत्या केल्याचा दावा केला होता. त्यांच्या शरिरावर अनेक ठिकाणी वार केले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान पोलिसांना त्याच गावातील 65 वर्षीय अनंतलाल मंडल यांच्यावर संशय आला. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या दाव्यानुसार, चौकशीदरम्यान त्यांनी आपल्या दोन मुलांसोबत मिळून खुनाची कबुली दिली.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुमारे वर्षभरापूर्वी अनंतलाल यांच्या सहा महिन्यांच्या नातवाचा मृत्यू झाला होता. यानंतर, पुजारी हिरालाल मंडल यांनी काळ्या जादूने मुलाची हत्या केल्याचा कुटुंबाला संशय येऊ लागला. याच संशयामुळे आणि रागामुळे अनंतलाल यांनी आपल्या दोन मुलांसोबत मिळून पुजाऱ्याला ठार मारण्याचा कट रचला.

तपासादरम्यान पोलिसांनी काही वस्तूही जप्त केल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीच्या घराच्या आवारात तुळशीच्या रोपाजवळ पुजाऱ्याचा हार लपवून ठेवण्यात आला होता. हत्येसाठी वापरलेला चाकू अनंतलालच्या मुलाच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. बरसोईचे डीएसपी मंगलेश कुमार सिंह यांनी सांगितले की, पोलिसांनी अनंतलालला अटक केली असून त्याच्या दोन मुलांना पकडण्यासाठी पथक रवाना झाले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES