• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • / तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? 4 महिन्यात निकाल लागणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार?

तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? 4 महिन्यात निकाल लागणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार?

तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाला 4 महिन्यांत निकाल द्यावा लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला 4 महिन्यांत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Sep 28, 2026, 10:48 PM IST|Updated: Sep 28, 2026, 10:59 PM IST
joinshare
 तृणमूल काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? 4 महिन्यात निकाल लागणार? निवडणूक आयोग काय निर्णय देणार?

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

महामुंबईत आणखी एक मेट्रो धावणार, डोंबिवलीतून - नवी मुंबई प्रवास आता फास्ट होणार

2

जीम ट्रेनरसोबत पत्नीचं अफेअर, पहाटे प्रियकराला घरी बोलवलं आणि पती झोपेत असतानाच...

3

'... ते काम त्यांच्याकडून करुन घेणं योग्य नाही', केतकी-रोहनच्या आरोपांनंतर लीना भागवत-मंगेश कदम स्पष्टच बोलले, 'तिसऱ्यांदा मानधन...'

4

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

5

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तृणमूल काँग्रेस पक्ष : पश्चिम बंगालच्या राजकारणावर तब्बल 15 वर्ष एकहाती वर्चस्व असलेल्या तृणमूलच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांचा 2026 च्या विधानसभा निवडणूकीत मोठा पराभव झाला. त्या पराभवानंतर ममता बॅनर्जी यांना 15 वर्षानंतर मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं.  सत्ता गेल्यानंतर ममतांच्या टीएमसीला फुटीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळालं. तृणमूलमध्ये उभी फुट पडलीय.ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आमदारांनी बंडखोरी करत आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा केला. जसा महाराष्ट्रात शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी केला होता आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी केला होता. तशीच अवस्था टीएमसीची झाली. यामुळे हे प्रकरण निवडणूक आयोगात पोहोचले. निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावर अंतरिम बंदी घातली. सुप्रीम कोर्टानं याबाबत महत्वाचे आदेश दिले. सुप्रीम कोर्टानं  निवडणूक आयोगाला 4 महिन्यांत निकाल देण्याचे निर्देश दिले आहेत.
 

तृणमूल काँग्रेसच्या नाव आणि चिन्हावर बंदी घातल्यानंतर दोन्ही गटांना तीन नावं आणि तीन चिन्हांचा पर्याय देण्यास सांगण्यात आलं. दिलेल्या पर्यांयांपैकी एक नाव आणि एक चिन्ह हे दोन्ही गटांना देण्यात आलं.  'ममता ऑल इंडिया टीएमसी' ला फुटबॉल खेळाडू चिन्ह देण्यात आले आहे.  ऋतब्रत बॅनर्जी गटाला  डेमॉक्रॅटिक तृणमूल काँग्रेस नाव देण्यात आले असून लिफाफा चिन्ह देण्यात आले आहे. 
 

ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसमधील (AITC) अंतर्गत फुटीनंतर पक्षाचे नाव आणि मूळ पक्षचिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पक्षनाव आणि चिन्हाबाबतचा हा विवाद चार महिन्यांच्या आत सोडवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. 
 

न्यायालयाने दोन्ही गटांना आपापले म्हणणे मांडण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत निवडणूक आयोगाने यावर अंतिम निर्णय घ्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे एकंदरीत आगामी चार महिन्यांत तृणमूल काँग्रेसच्या मूळ चिन्हाचा निर्णय लागणार आहे.
 

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाच्या अंतरिम निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पक्षात अंतर्गत बंडखोरी झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ‘ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि पक्षाचे अधिकृत चिन्ह ‘जोडाफूल’ (फूल आणि गवत) वापरण्यास अंतरिम स्थगिती दिली होती.
 

दरम्यान तृणमूल पक्ष आणि चिन्ह गोठवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत... भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडत असल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india