SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा कॉल; ऑडिओ तपासणीत मोठा खुलासा

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूरला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागितल्याची धमकी मिळाली. हॅरी बॉक्सर असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा आवाज पोलिसांच्या ऑडिओ नमुन्यांशी जुळला नाही.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 03, 2026, 07:39 PM IST | Updated: Nov 03, 2026, 07:57 PM IST
Image Credit: तुषार कपूर
Join

बॉलिवूड अभिनेता तुषार कपूर याला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात व्यक्तीने फोन करून आपण बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. या व्यक्तीने स्वतःची ओळख हॅरी बॉक्सर अशी करून दिली आणि तुषार कपूरकडे 5 कोटी रुपयांची मागणी केली. धमकी मिळाल्यानंतर अभिनेत्याने मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाकडे आणि गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आहे.

हॅरी बॉक्सर असल्याचा दावा

या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या आवाजाची पोलिसांनी तपासणी केली आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या तांत्रिक पथकाने धमकीच्या ऑडिओ रेकॉर्डिंगची तुलना हॅरी बॉक्सर याच्या उपलब्ध अधिकृत आवाजाच्या नमुन्यांशी केली. मात्र, दोन्ही आवाजांमध्ये साम्य आढळले नाही. प्राथमिक तपासात हा आवाज जुळत नसल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे संबंधित व्यक्ती खरोखरच बिश्नोई गँगशी संबंधित आहे की केवळ गँगचे नाव वापरून सेलिब्रिटींना धमकावत आहे, याबाबत संशय निर्माण झाला आहे.

बिश्नोई गँगच्या नावाचा वापर?

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अज्ञात व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून तुषार कपूरला घाबरवण्याचा प्रयत्न केला असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या धमक्यांमध्ये कुख्यात टोळीचे नाव वापरून समोरच्या व्यक्तीवर दबाव निर्माण केला जातो आणि त्यातून पैशांची मागणी केली जाते.

मुंबई पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

धमकी मिळाल्यानंतर तुषार कपूरने मुंबई पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर अभिनेत्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलमार्फत केला जात आहे. दरम्यान, तुषार कपूरने साधारण आठवडाभरापूर्वी पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगितल जातंय.

बॉलिवूडमध्ये चिंतेचे वातावरण

काही आठवड्यांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफच्या जुहू येथील परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. याच पार्श्वभूमीवर तुषार कपूरला मिळालेली धमकी  समोर आली आहेय  त्या घटनेशी बिश्नोई गँगशी संबंधित व्यक्तींनी संबंध असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मुंबईतील चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES