• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /नाशिक
  • /महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!

महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!

महाराष्ट्राची गंगा अशी ओळख असलेली गोदावरी नदी अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. गोदावरी नदीत ऑक्सिजन उरलेलाच नाही. परिक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 03, 2026, 09:10 PM IST|Updated: Nov 03, 2026, 09:14 PM IST
joinshare
महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

टी20 नंतर वनडेतही टीम इंडिया न्यूझीलंडला देणार दणका? कशी असणार भारताची प्लेईंग 11?

2

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

3

महाराष्ट्राची गंगा असलेल्या नाशिकच्या गोदावरीच्या पाण्यात ऑक्सिजन उरलेलाच नाही; पाण्याचे नमुने पाहून संशोधक हादरले!

4

Pension News: पेन्शनधारकांच्या खात्यात दरमहा किती रुपये वाढून येणार? ₹30 हजार पेन्शनधारकांना किती रुपयांचा फायदा?

5

तुषार कपूरला बिश्नोई गँगच्या नावाने 5 कोटींची खंडणी मागणारा धमकीचा कॉल; ऑडिओ तपासणीत मोठा खुलासा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

नाशिक : नाशिकची जीवनदायिनी आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी आता अक्षरशः मृत्यूशय्येवर आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची धामधूम सुरू असतानाच एक अत्यंत चिंताजनक वास्तव समोर आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, गोदावरीच्या पाण्यात आता प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन उरलेलाच नाहीये आणि नदी जैविकदृष्ट्या पूर्णपणे मृत झाली आहे. 

कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेली गोदावरी आता फक्त नावापुरती नदी उरली आहे का प्रश्न उपस्थित होत आहे. विनाशप्रक्रिया सोडलेले सांडपाणी, मानवी विष्ठा आणि रासायनिक कचऱ्यामुळे नदी महाकाय गटारीकडे वाटचाल सुरु आहे. 

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 5 ऑक्टोबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाने गोदावरी-कपिला संगम तपोवन, नांदूर-दसक आणि टाकळी या तीन ठिकाणच्या पाण्याचे नमुने घेतले. याच्या निरिक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे.  

19 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या अहवालाने सर्वांचीच झोप उडवली.  कारण या तिन्ही ठिकाणी पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन चक्क शून्य आढळला आहे.  प्रदूषणाची आकडेवारी भीषण वास्तव मांडणारी आहे.  तपोवन संगमावर बीओडी सुरक्षित मर्यादेपेक्षा तब्बल 28 पटीने जास्त आढळून आला आहे.  या अहवालातून स्पष्ट झाले आहे की हे पाणी आता करड्या रंगाचे, गढूळ आणि तीव्र दुर्गंधीयुक्त झाल आहे.  एवढेच नाही तर हे पाणी स्नानासाठीही असुरक्षित बनलं आहे.  

निरीक्षणातून समोर आली धक्कादायक आकडेवारी

तपोवन येथील गोदावरी-कपिला संगमावर बीओडी 85, तर सीओडी 197 मिलिग्रॅम
नांदूर-दसक परिसरात  बीओडी 51, तर  सीओडी 48 इतका आहे. 
तपोवन नमुन्यात फिकल कॉलिफॉर्म 70 आणि टोटल कॉलिफॉर्म 280 एमएल
नांदूर-दसकमध्ये फिकल कॉलिफॉर्म 63 तर टाकळी परिसरात फिकल कॉलिफॉर्म 33 नोंदवले गेले
पाण्यात ऑक्सिजन नसणे म्हणजे नदीतील जलचर, मासे आणि सूक्ष्मजीव साखळी संकटात आहे.
कोट्यवधी रुपयांचा निधी कुंभमेळ्यासाठी खर्च होत असताना, नदीत सांडपाणी आणि जैविक प्रदूषणाचा हा परिणाम प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. 
प्राणवायू हरवलेल्या या मृत गोदावरीला आता नवसंजीवनी मिळणार का, हाच खरा प्रश्न आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nashik
Religious News