IND VS NZ ODI 1st Playing 11 : 4 नोव्हेंबर पासून भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांच्या वनडे सीरिज मधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध झालेली 5 सामन्यांची टी20 सीरिज ही टीम इंडियाने 3-2 ने आघाडी घेऊन जिंकली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा वनडे फॉरमॅटमध्ये न्यूझीलंडला पराभवाचा दणका देण्यासाठी भारताचा वनडे संघ मैदानात उतरेल. टीम इंडियाच्या संघात यावेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या नावाचा समावेश आहे. तेव्हा 4 नोव्हेंबर पासून सुरु होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असू शकते? याविषयी जाणून घेऊयात.
कोण कोण असणार प्लेईंग 11 मध्ये?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यात शुभमन गिल सह विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं स्थान निश्चित आहे. रोहित आणि शुभमन हे दोघे ओपनिंग करतील तर विराट हा नंबर तीन वर फलंदाजीसाठी उतरेल. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यरचं खेळणं निश्चित असून विकेटकिपरसाठी भारताकडे दोन पर्याय आहेत. यात पहिला पर्याय हा केएल राहुल आणि तर दुसरा पर्याय हा ईशान किशन आहे. ईशान किशनला पहिल्या सामन्याच्या प्लेईंग ११ मध्ये संधी मिळू शकते. नितीश कुमार रेड्डी आणि अक्षर पटेल यांचे खेळणे निश्चित मानले जात आहे. नमन धीर हा आणखी एक पर्याय आहे. त्याने टी २० सीरिजमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. परंतु संघ त्याला संधी दिली जाईल असं वाटत नाही. स्पिनरमध्ये भारताची पहिली पसंती ही कुलदीप यादव असेल. तर वेगवान गोलंदाज म्हणून सर्वांचं लक्ष हे मोहम्मद सिराजवर असेल. जर सिराज उपलब्ध नसेल तर त्याच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल. गुरनूर ब्रार आणि अंशुल कंबोज हे इतर दोन गोलंदाज असतील.
वनडे सीरिजचं वेळापत्रक :
पहिला सामना 4 नोव्हेंबर
दुसरा सामना 7 नोव्हेंबर
तिसरा सामना 10 नोव्हेंबर
चौथा सामना 13 नोव्हेंबर
पाचवा सामना 15 नोव्हेंबर
भारताची संभाव्य प्लेईंग 11 :
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी,अक्षर पटेल, कुलदीप यादव,अर्शदीप सिंह, अंशुल कंबोज, गुरनूर बरार
वनडे सीरिजसाठी संघ :
भारतीय संघ :
रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, नमन धीर, औकिब नबी, रुतुराज गायकवाड, ईशान किशन.
न्यूझीलंड संघ :
हेन्री निकोल्स, विल यंग, टॉम लॅथम (विकेटकिपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, जेकब डफी, नॅथन स्मिथ, मॅथ्यू फिशर, ब्लेअर टिकनर, टिम सायफर्ट, काइल जेमिसन