• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

AIMIM नगरसेविका सहर शेख यांनी औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत मुघल इतिहासावर पोस्ट केली. ताजमहाल, हुमायूनचा मकबरा आणि ‘इतिहास पुसता येणार नाही’ या विधानामुळे नवा वाद निर्माण झालाय.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 04, 2026, 10:10 PM IST|Updated: Nov 04, 2026, 10:24 PM IST
joinshare
‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'
Image Credit: सहर शेख

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

3

कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा

4

दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी

5

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

‘कैसा हराया’ या वक्तव्यामुळे काही महिन्यांपूर्वी चर्चेत आलेल्या AIMIM च्या नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मुघल सम्राट औरंगजेबाबाबतच्या सोशल मीडिया पोस्टमुळे पुन्हा वाद निर्माण झालाय. सहर शेख यांनी इन्स्टाग्रामवर औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या राजवटीचे कौतुक केले. ‘इतिहास कधीही पुसता येणार नाही’, असा संदेश देतानाच त्यांनी ताजमहाल आणि हुमायूनचा मकबरा यांसारख्या वास्तूंचाही उल्लेख केला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीका सुरू झाली असून महाराष्ट्रातील औरंगजेबाच्या इतिहासावरून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलंय नेमकं?

सहर शेख यांनी औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यात त्यांनी औरंगजेबाचा उल्लेख ‘श्रद्धा आणि ताकदीने राज्य करणारा सम्राट’ असा केला. औरंगजेबाबाबत कितीही नकारात्मक चित्रण केले किंवा त्याची प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न केला, तरी इतिहास पुसता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. या पोस्टमुळे सहर शेख यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ताजमहाल, हुमायूनच्या मकबऱ्याचा दाखला

या पोस्टमध्ये सहर शेख यांनी मुघलकालीन वास्तूंचे फोटोही शेअर केले आहेत. हुमायूनच्या मकबऱ्यासमोरचे छायाचित्र पोस्ट करत त्यांनी त्या काळातील वास्तुकलेचा उल्लेख केला. ताजमहालाचा फोटो शेअर करून मुघलकालीन स्थापत्यकलेचे महत्त्व अधोरेखित केले. मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून बाजूला करता येईल; मात्र देशाच्या ऐतिहासिक वारशातून तो कसा पुसणार, असा सवालही त्यांनी पोस्टमधून उपस्थित केला.औरंगजेबाची प्रतिमा खराब करण्यासाठी चित्रपटांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात असल्याचा दावा सहर शेख यांनी पोस्टमध्ये केला. अशा चित्रपटांमुळे इतिहास बदलणार नाही, अशा आशयाची पोस्ट त्यांनी केलीय. 

नितेश राणेंकडून टीका

सहर शेख यांच्या पोस्टनंतर भाजप मंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केलीय. इकडे हिरवेकरण करण्यासाठी तिला सुपारी दिली गेली आहे. मुघलाची आठवण येत असेल तर ती पाकिस्तानात गेली तर आम्हाला त्याची काळजी नसेल.असे हिरवे साप आम्हाला देशात नको आहे. मुघलाची आठवण येत असेल तर वडिलांना घेऊन मुघलाकडे गेली तर आमची हरकत नाही, असे नितेश राणे म्हणाले. ती हिंदू राष्ट्रांमध्ये निवडून आली ही ती विसरली असावी.. मुघलांना गाडून तयार झालेली ही शिवाजी महाराजांची भूमी.. आणि महादेवाची भूमी आहे.  हा कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही हे त्यांनी आठवण ठेवावं नाहीतर असे पार्सल आम्हाला पाकिस्तान मध्ये पाठवता येतात, असेही ते पुढे म्हणाले.

‘कैसा हराया’नंतर पुन्हा चर्चेत

ठाणे महापालिका निवडणुकीनंतर ‘कैसा हराया’ या विधानामुळे सहर शेख यांचे नाव राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर आता औरंगजेबाबाबतच्या पोस्टमुळे त्या पुन्हा राजकीय वादात सापडल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Nitesh Rane
Mumbai
Mumbai News