• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

पुण्यात पायल झांबरे प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून पायल झांबरेने संपवलं जीवन. पती अक्षय झांबरेला अटक झाली आहे. आता कुणाला अचक होणार याबाबत पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी माहिती दिली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 03, 2026, 09:36 PM IST|Updated: Nov 03, 2026, 09:40 PM IST
joinshare
पुण्यातील पायल झांबरे मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; पतीनंतर आता कुणाला आणि कधी अटक होणार? पोलीसांनी थेट नावच सांगितले

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2027 च्या शेड्युलची घोषणा, मुंबई सह 'या' शहरात होणार सामने, पाहा संपूर्ण वेळापत्रक

2

‘कैसा हराया’फेम सहर शेखकडून औरंगजेबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा; 'मुघलांचा इतिहास पुस्तकांमधून हटवाल पण...'

3

कमी दारू पिणाऱ्यांनीही सावध व्हा! कॅन्सरच्या जोखमीवर WHO चा मोठा खुलासा

4

दिल्लीतील प्रदूषणामुळे भारत - श्रीलंका सामना शिफ्ट करण्याची मागणी

5

अग्निवीरांसाठी केंद्र सरकारचा निर्णय! 4 वर्षांनंतरही सेवेत राहण्याची संधी; मोठी अपडेट समोर!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुणे क्राईम : पुण्यात एका 29 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. पायल झांबरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पायल झांबरे नामांकित झांबरे पॅलेच्या मालकाची सून असल्याची माहिती आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती अक्षय झांबरे याला अटक केली आहे. पुढील कारवाईबाबात पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली.

पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी इतर आरोपींना करा, अन्यथा आम्ही नँशनल हायवे वर रास्तारोको करू असा इशारा तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिला.आज तिचे सर्व नातेवाईक हे स्वारगेट पोलीस स्टेशनला आले होते. त्यावर मयत मुलीचा नवरा ऑलरेडी अटकेत असून त्याला 7 नोव्हेंबर पीसी देखील मिळालीय तर सासरे यांचा दवाखान्यातून डिस्चार्ज होताच त्यांनाही अटक करू, असं आश्वासन पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी दिले. हुंडाबळीच्या जाचातूनच आमच्या मुलीने आत्महत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांचा आरोप आहे या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे  पुणे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला संताप

पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर करत सुप्रिया सुळे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.  पुण्यातील मुकुंदनगर भागात राहणाऱ्या उच्चशिक्षित पायल झांबरे यांची आत्महत्या मन हेलावून टाकणारी आहे. दरवर्षी दिवाळीला 5 ते 10 तोळे सोने आणण्यासाठी आणि हुंड्यासाठी सासरच्यांकडून त्यांचा छळ केला जात होता, असा गंभीर आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे.

पायल यांच्या पश्चात त्यांची चार वर्षांची निष्पाप मुलगी असून, तिच्या डोक्यावरून आईचे छत्र कायमचे हिरावले गेले आहे, हे अतिशय दुःखद आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रात आजच्या काळातही एका उच्चशिक्षित महिलेला हुंडा आणि सोन्याच्या लोभापोटी अशा अमानुष छळाला सामोरे जावे लागणे, हे अत्यंत संतापजनक व लाजीरवाणे आहे.

पुणे शहर पोलीस व संबंधित तपास यंत्रणांनी या प्रकरणाची केवळ आत्महत्या म्हणून नोंद न करता, माहेरच्यांनी केलेल्या छळ व घातपाताच्या आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करावी. यासोबतच फरार असणारे संशयित आणि त्यांना आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई करावी. पायल यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा होईल यासाठी ठोस प्रयत्न करावेत आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. 

या दुःखद प्रसंगी आम्ही सर्वजण पायलच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली!

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Pune
Pune News
crime