• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /एक मेसेज आणि तुमचा फोन ठप्प; काय आहे एसएमएस ऑफ डेथ? ज्यामुळे मोबाईल यूजर्सना भरलीय धडकी!

एक मेसेज आणि तुमचा फोन ठप्प; काय आहे एसएमएस ऑफ डेथ? ज्यामुळे मोबाईल यूजर्सना भरलीय धडकी!

अँड्रॉइड फोनवर एसएमएस ऑफ डेथ सुरक्षा त्रुटीचा धोका समोर आलाय. अदृश्य एसएमएसमुळे कॉलिंग सेवा क्रॅश होऊ शकते आणि फोन बूटलूपमध्ये अडकू शकतो. कोणत्या अँड्रॉइड आवृत्त्यांना धोका आणि फोन सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे? जाणून घेऊया.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 01, 2026, 05:35 PM IST|Updated: Nov 01, 2026, 05:43 PM IST
joinshare
एक मेसेज आणि तुमचा फोन ठप्प; काय आहे एसएमएस ऑफ डेथ? ज्यामुळे मोबाईल यूजर्सना भरलीय धडकी!
Image Credit: एसएमएस ऑफ डेथ

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
एकदिवसीय मालिकेआधी गुरनूर ब्रारचे शर्टलेस फोटो आणि चॅट्स व्हायरल! Fact Check

एकदिवसीय मालिकेआधी गुरनूर ब्रारचे शर्टलेस फोटो आणि चॅट्स व्हायरल! Fact Check

2

एक मेसेज आणि तुमचा फोन ठप्प; काय आहे एसएमएस ऑफ डेथ? ज्यामुळे मोबाईल यूजर्सना भरलीय धडकी!

3

24 आमदारांचा थेट मुख्यमंत्र्यांविरोधात वेगळा गट; भारतातील आणखी एका राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप?

4

संजय गुप्ता यांच्या अंत्यसंस्कारावेळी लेकीचे कॅमेऱ्यासमोर अश्लिल हावभाव! VIDEO व्हायरल

5

'ज्ञानेश कुमारशिवाय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ शकले नसते', राहुल गांधींचा गंभीर आरोप

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

तुमच्या मोबाईलवर एखादा साधा एसएमएस आला आणि त्यामुळे संपूर्ण फोनच बंद पडला तर? अ‍ॅड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आढळलेल्या एका गंभीर सुरक्षा त्रुटीमुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. एसएमस ऑफ डेथ असे या त्रुटीला नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हा मेसेज नेहमीच्या एसएमएसप्रमाणे इनबॉक्समध्ये दिसतही नाही आणि तो उघडण्याची गरजही नसते. सायबर सुरक्षा संशोधक मार्क ब्लास्झिक यांनी ही त्रुटी उघड केलीय.  यामुळे फोनची कॉलिंग सेवा बंद पडू शकते, सुरू असलेले कॉल ब्रेक होऊ शकतात आणि काही प्रकरणांत फोन वारंवार रीस्टार्ट होण्याच्या समस्येत अडकू शकतो. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

एसएमएस ऑफ डेथ म्हणजे नेमके काय?

अ‍ॅड्रॉईडच्या टेलिफोनी सिस्टीममधील एका तांत्रिक त्रुटीचा गैरवापर करून विशेष प्रकारचा डेटा एसएमएस तुम्हाला पाठवला जाऊ शकतो. मेसेज प्रोसेस होत असताना फोन क्रॅश होतो.यूजर्सनी मेसेज उघडायचा नसोत किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करायचे नसते. त्यामुळे याला ‘झिरो-क्लिक’ हल्ला म्हटले जाते.

फोनवर नेमका काय परिणाम होऊ शकतो?

या त्रुटीमुळे फोनमधील कॉल हाताळणारी सिस्टीम बंद पडू शकते. परिणामी सुरू असलेले कॉल ब्रेक होऊ शकतात आणि काही काळ नेटवर्क सेवा खंडित होऊ शकते. वारंवार असे मेसेज आल्यास फोन बूटलूपमध्ये अडकण्याची शक्यता असते. म्हणजेच यूजर फोन सुरू होण्याचा प्रयत्न करतो, पण फोन पुन्हा क्रॅश होतो. आपत्कालीन क्रमांकांवरील कॉलही अशा वेळी खंडित होऊ शकतात.

कोणत्या अ‍ॅड्रॉईड फोनला धोका?

संशोधकांनी अ‍ॅड्रॉईड 12 ते अ‍ॅड्रॉईड 16 पर्यंतच्या आवृत्त्यांवर या त्रुटीची चाचणी केली. गुगलने अ‍ॅड्रॉईड 14 ते 17 साठी ऑक्टोबर 2026 च्या सुरक्षा अपडेटमध्ये दुरुस्ती केली. मात्र अ‍ॅड्रॉईड 12 आणि 13 वापरणाऱ्या काही हँडसेटना हे अपडेट मिळालेली नाही. प्रत्यक्ष धोका फोनच्या मॉडेलवर आणि उपलब्ध सुरक्षा अपडेटवर अवलंबून आहे.

फॅक्टरी रिसेट केल्यानेही समस्या सुटेलच असे नाही

या हल्ल्यातील मेसेज फोनच्या इनबॉक्समध्ये दिसत नसल्यामुळे तो ओळखणे कठीण ठरू शकते. फोन पुन्हा सुरू झाल्यावर नेटवर्ककडून तोच मेसेज पुन्हा पाठवला गेल्यास समस्या कायम राहू शकते. संशोधकांच्या मते, काही प्रकरणांत कॉम्प्युटरला फोन जोडून तांत्रिक पद्धतीने मेसेज हटवावे लागू शकतात. सामान्य यूजर्ससाठी ही प्रक्रिया अजिबात सोपी नसते.

अ‍ॅड्रॉईड यूजर्सनी काय काळजी घ्यावी?

मोबाईलच्या सेटींगमध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट तपासा. उपलब्ध असलेले लेटेस्ट अ‍ॅड्रॉईड आणि सिक्योरीटी अपडेट त्वरित इन्स्टॉल करा.
अपडेटनंतर फोन रीस्टार्ट करा. फोनला सिक्योरीटी अपडेट मिळत नसल्यास प्रोडक्टच्या अधिकृत सपोर्टकडून माहिती घ्या. फोन वारंवार क्रॅश होत असल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरची मदत घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india