LIVE Updates 1 November 2026 : इंडिया आघाडीचा मार्च सुरू झालाय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानावरून मार्च सुरू झालाय. गुन्हे शाखेकडून टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा करण्यात आलाय. मुख्य सूत्रधार अनिल पंडितने तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी बँक खात्यांचे जाळे विणल्याची माहिती देण्यात आली.
01 Nov 2026, 5:28 PM
मुंबईत तिरंगा सत्याग्रह रॅली,आंदोलकांकडून मंत्रालय परिसरात जाण्याचा प्रयत्न
मुंबईत तिरंगा सत्याग्रह रॅली सुरु आहे. आंदोलकांकडून मंत्रालय परिसरात जाण्याचा आग्रह सुरु आहे. मात्र पोलीस आंदोलकांना थांबवून ठेवत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी व इतर आंदोलन महापालिका मुख्यालय समोर आंदोलन करत आहेत.
01 Nov 2026, 4:12 PM
राहुल गांधींचा रॅलीतून मोदी-शाह यांना संदेश, सरकारवर हल्लाबोल करत काय म्हणाले?
देशातून लोकशाही संपवू देणार नाही., असे म्हणत राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. मोदी-शाह यांना त्यांनी आपल्या रॅलीतून संदेश दिलाय. तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही, असे ते म्हणाले.
01 Nov 2026, 4:06 PM
कोकणात शेतकरी हवालदिल! ना भात, ना चारा;पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न!
कोकणातील बळीराजावर निसर्गाचा दुहेरी घाला पडला आहे. कोकणाचं प्रमुख पीक असलेल्या भाताच्या मळणीला जागोजागी सुरुवात झाली असली, तरी शेतकऱ्यांच्या हाती केवळ निराशा आली आहे. यंदा पावसाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न निम्म्यावर आले असून लोंब्यांमध्ये दाण्यांऐवजी पोळ भरल्याचे चित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे यंदा केवळ धान्याचीच नव्हे, तर जनावरांच्या चाऱ्याचीही मोठी टंचाई निर्माण झाली आहे. पेंढा कमी पडल्याने गोशाळांसमोर आणि पशुपालकांसमोर चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
01 Nov 2026, 4:01 PM
जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम केला जावा, मोर्चाची मागणी
गडचिरोलीत सकल ओबीसी समाजाच्या वतीने आज एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सध्याच्या सुरू असलेल्या जनगणनेत ओबीसी समाजाच्या मोजणीचा स्वतंत्र कॉलम असावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. स्थानिक शिवाजी महाविद्यालय मैदानातून निघालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. आपल्या मागणीच्या समर्थनार्थ जिल्हाभरातून मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव या मोर्चात सहभागी झाले. यापुढील काळात ओबीसींसाठीची योजना आणि तिची अंमलबजावणी यासाठी समाजाचा टक्का माहित असणे आवश्यक असल्याचे मत याप्रसंगी आयोजकांनी बोलून दाखविले. यासाठीच आगामी संसद अधिवेशन काळात दिल्लीत भव्य निदर्शन कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
01 Nov 2026, 3:01 PM
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी
उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले.राज ठाकरे यांच्या घरगुती कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचले. तर उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले आहेत.स्मारकाच्या कामाची पाहणी आणि आढावा बैठकीसाठी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात पोहचले आहेत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली असून याचा आढावा उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून वारंवार घेतला जात आहे.
01 Nov 2026, 2:58 PM
राहुल गांधी रामलीला मैदानावर पोहोचले
राहुल गांधी रामलीला मैदानावर पोहोचले आहेत.राहुल गांधी थोड्याच वेळात रामलीला मैदानातील मंचावर येणार आहेत.ओपन बस मध्ये बसून इंडिया आघाडीचे सर्व नेते निघाले. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, ओपन बसमध्ये आहेत.संजय राऊत, मेहबूबा मुफ्ती, अभिषेक बॅनर्जी, तेजस्वी यादव दाखल झाले आहेत.
01 Nov 2026, 2:51 PM
नवी दिल्लीत इंडिया आघाडीचा मार्च सुरू
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानावरून मार्च सुरू झालाय. ओपन बस मध्ये बसून इंडिया आघाडीचे सर्व नेते निघाले. राहुल गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, सुप्रिया सुळे, ओपन बसमध्ये आहेत. संजय राऊत, मेहबूबा मुफ्ती, अभिषेक बॅनर्जी, तेजस्वी यादव दाखल झाले आहेत.
प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.